लंडन - येथील 'दि लैन्सेट' या मासिकाने प्रकाशित केलेल्या लेखात फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) ही लस भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या डेल्टा (बी.1.617.2) स्ट्रेनवर कमी प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती कमी निर्माण करते. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नव्या डेल्टा स्ट्रेनविरुद्ध लढण्याची क्षमता ही मागच्या बी.1.1.7 या स्ट्रेनच्या तुलनेत कमी आहे, असा दावा करण्यात आला आहे.
बी.1.1.7 (अल्फा) या स्ट्रेनच्या तुलनेत कमी परिणामकारक -
लेखात त्यांनी असे म्हटले आहे की, शरीराला या व्हायरसची ओळख पटेपर्यंत त्याविरोधी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती वाढत्या वयानुसार कमी होत जाते. त्याचा स्तर हा काही काळानंतर खालावत जातो. फायझर-बायोएनटेक या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाच्या नव्या डेल्टा (बी.1.617.2) स्ट्रेनविरुद्ध लढण्याची क्षमता ही मागच्या बी.1.1.7 (अल्फा) या स्ट्रेनच्या तुलनेत कमी आहे.
पाच विविध जाती विरोधातही लढण्याची क्षमता -
ब्रिटन येथील फ्रांसिस क्रिक इंस्टिट्यूटच्या संशोधकांकडून करण्यात आलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, केवळ लशींच्या रोगप्रतिकारशक्तीवरील अभ्यास न करता रुग्णांच्या संभाव्य घटनाबाबतही अभ्यास करणे गरजेचे आहे. या अभ्यासात त्यांनी म्हटले आहे की, कोविड रुग्णाला जर फायझर-बायोएनटेक या लसीचे एक किवा दोन डोस घेतलेल्या २५० रुग्णांचे निरीक्षण करण्यात आले आहे. या निरीक्षणात असे आढळले आहे की, पहिला डोस घेतलेल्या रुग्णामध्ये तीन महिन्यापर्यंत कोविड विरोधी रोगप्रतिकारशक्ती राहते. तर संशोधकांनी सार्स-कोव-2 या व्हायरसच्या पाच विविध जाती विरोधातही लढण्याची क्षमता या रुग्णांमध्ये असल्याचे निरीक्षणातून नोंदवले आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
हेही वाचा - लस उपलब्ध करून देण्याकरिता भारत सरकारबरोबर चर्चा सुरू- फायझर