जेरुसलेम : इस्राईलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू येत्या काही दिवसांमध्येच पंतप्रधान निवासस्थान सोडणार आहेत. १० जूलैपूर्वी ते सहपरिवार या निवासस्थानातून दुसरीकडे जातील. नेतान्याहू, आणि इस्राईलचे नवे पंतप्रधान नफ्ताली यांनी याबाबत माहिती दिली.
दोन वर्षांमध्ये सलग चौथ्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विदेशमंत्री याईल लापिद आणि पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन केले आहे. यानंतर नेतान्याहू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या आठवड्यातच बेनेट सरकारचा शपथविधीही पार पडला होता. मात्र, तरीही १२ वर्षे पंतप्रधान राहिलेल्या नेतान्याहू यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले नाहीये.
कित्येक वर्षांपासून नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप होत होते. गेल्या वर्षी बलफोर स्ट्रीटवर असणाऱ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनही करण्यात आले होते. मात्र तरीही नेतान्याहू यांनी पंतप्रधान पद सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर यावर्षी मात्र एकापेक्षा अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत, नेतान्याहू यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला होता. यासाठी तब्बल आठ विरोधी पक्ष, काही छोटे पक्ष आणि एक इस्लामिक संघटना एकत्र आली होती.
हेही वाचा : कोरोनामुळे भारत उद्ध्वस्त झाला, चीनने नुकसानभरपाई द्यावी - डोनाल्ड ट्रम्प