इयालत - पंजाबची सौंदर्यवती हरनाझ संधू (Harnaaz Sandhu crowned Miss Universe 2021) ही विश्वसुंदरी 2021 (Miss Universe 2021) ठरली आहे. इस्रायलमधील इयालत (Eilat ) येथे मिस युनिव्हर्स 2021 ची (Miss Universe 2021 Winner) घोषणा झाली. मेक्सिकोची अँड्रिया मेझाने मिस युनिव्हर्स हरनाझ संधूच्या डोक्यावर मुकुट घातला.
-
The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021The new Miss Universe is...India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
जगभरातील सौदर्यंवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तब्बल 21 वर्षांनंतर भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’ किताब जिंकला आहे. यापूर्वी 2000 मध्ये लारा दत्तानेमध्ये ‘मिस युनिव्हर्स 2021’ पटकावले होते.
चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. हरनाझने कमी वयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. हरनाझ पेशाने मॉडेल तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझने हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.
हरनाझने मिळवलेले किताब -
2017 मध्ये हरनाझने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. तर 2018 मध्ये, हरनाझला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 चा अवॉर्ड मिळाला होता. यानंतर हरनाझने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप 12 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया 2021 चा मुकुट पटकावला होता. आता तिने थेट ‘मिस युनिव्हर्स 2021’ चा किताब पटकावला आहे.