नवी दिल्ली - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारत अनेक मित्र देशांना मदत करत आहे. त्यातील एक देश म्हणजे अफगाणिस्तान. भारताने नुकतीच अफगाणिस्तानाला अन्न टंचाई निर्माण होऊ नये म्हणून गव्हाची मदत केली आहे. त्यानंतर आता पुन्हा वैद्यकीय मदत देऊ केली आहे.
एक लाख पॅरासिटिमॉल गोळ्यांसह 5 लाख हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मदत अफगाणिस्तानला दिली आहे. एरियाना एअरलाईन्सद्वारे ही मदत पाठविण्यात आली आहे. भारताने केलेल्या मदतीबद्दल अफगाणिस्तानचे दुतावास ताहिर कादरी यांनी भारताचे आभार मानले आहे.
भारताने याआधीही अमेरिका, ब्राझील आणि कुवैत देशांना वैद्यकीय मदत केली आहे. अनेक देशांनी भारताकडे एचसीक्यू गोळ्यांची मागणी केली आहे. त्यानुसार मित्र देशांना शक्य तेवढी मदत करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.