ETV Bharat / international

तुर्कीतील भूकंपातील मृतांची संख्या 49 वर - तुर्की एजियन समुद्रकिनारा

तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी नोंदवली गोली. तर, इतर भूकंपशास्त्र संस्थांनी ती 6.9 असल्याचे सांगितले. तुर्कीच्या मधून फॉल्ट लाईन्स (भूकंप रेषा) गेल्या आहेत त्यामुळे येथे भूकंपप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. येथे वारंवार भूकंप होण्याची शक्यता आहे. येथे 1999 मध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी वायव्य तुर्कीमध्ये सुमारे 18,000 लोकांचा बळी घेतला. याशिवाय, ग्रीसमध्येही भूकंप वारंवार होतात.

तुर्कीतील भूकंपातील मृतांची संख्या 49 वर

author img

By

Published : Nov 1, 2020, 5:20 PM IST

अंकारा - पश्चिम तुर्कीमधील भूकंपातील मृतांचा आकडा 49 लोकांपर्यंत वाढला आहे. तुर्की आपत्ती व आपत्कालीन व्यवस्थापन अध्यक्षांनी (एएफएडी) रविवारी अशी माहिती जाहीर केली. यापूर्वी 43 मृत्यूची नोंद झाली होती.

'ताज्या माहितीनुसार, 49 लोक मरण पावले असून 896 जखमी झाले आहेत,' एएफएडीने एका निवेदनात म्हटले आहे.

तुर्कीच्या एजियन किनारपट्टीवर आणि ग्रीस बेटावरील सामोसच्या उत्तरेकडे शुक्रवारी दुपारच्या सुमारास तीव्र भूकंपाची नोंद झाली. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती 6.6 इतकी नोंदवली गोली. तर, इतर भूकंपशास्त्र संस्थांनी ती 6.9 असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे तुर्कीमधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या इझमिरमधील इमारती पडल्या आणि सेफेरिहिसार जिल्ह्यात आणि ग्रीक बेटांवर त्सुनामी आली. त्यानंतर शेकडो कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्केही बसले.

हेही वाचा - भूकंपाने हादरला तुर्कस्तान... इमारती कोसळल्याचा भीषण व्हिडिओ

वेगवेगळ्या संस्थांचे आणि शहरांमधील 5 हजार 500 हून अधिक बचावकर्ते वाचलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी एकत्र काम करत होते. येथे मोठ्या प्रमाणात ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना संवेदनशील हेडफोन्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यावेळी घाबरलेल्या जनतेला नियंत्रित करून शांत करण्याचेही काम या स्वयंसेवकांनी केले.

तुर्कीच्या मधून फॉल्ट लाईन्स (भूकंप रेषा) गेल्या आहेत त्यामुळे येथे भूकंपप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. येथे वारंवार भूकंप होण्याची शक्यता आहे. येथे 1999 मध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी वायव्य तुर्कीमध्ये सुमारे 18,000 लोकांचा बळी घेतला. याशिवाय, ग्रीसमध्येही भूकंप वारंवार होतात.

हेही वाचा - ड्रोन आधारित चुंबकीय संशोधन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.