बगदाद - इराकमधील बगदाद येथे पुन्हा एकदा हवाई हल्ला झाला आहे. उत्तर बगदादध्ये भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे इराकी बिगरलष्करी सशस्त्र गटाच्या (मिलिशिया) ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा इराकमधील इराण समर्थक लढवय्यांचा गट आहे.
हेही वाचा - अमेरिकेचा बगदाद विमानतळावर हवाई स्ट्राईक; इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार
इराकमधील शिया मुस्लिमांचा पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सच्या (PMF - सामान्य नागरिकांची जमवाजमव करून तयार केलेले बिगरलष्करी सशस्त्र गट) वाहनाला लक्ष्य करण्यात आले. बगदादच्या उत्तरेकडील ताजी जिल्ह्यात मोठा हल्ला घडवून आणण्यात आला.
हेही वाचा - कोण होता अमेरिकन हल्ल्यात ठार झालेला इराणचा जनरल सुलेमानी?
शुक्रवारी, बगदादमध्येच बिगरलष्करी गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणारा हवाई हल्ला अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून घडवून आणला होता. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या या हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी आणि इराकी बिगरलष्करी सेनेचा कमांडर अबु महदी अल-मुहान्दीस ठार झाला. त्याच्यासह आणखी ६ जणही ठार झाले.
हेही वाचा - सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, इराणची प्रतिज्ञा