इदलिब - रशियाने हवाई हल्ला करून शनिवारी सिरियाच्या उत्तर-पश्चिमेकडील बंडखोरांचा गड उध्वस्त केला आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. यात एक कार्यकर्ता आणि एका युद्ध मॉनिटरचाही मृत्यू झाला.
सिरियन सरकार आणि रशियाने तीव्र हवाई हल्ल्याबरोबरच जमिनीवरूनही हल्ला केला. इदलिबच्या परिसरात 3 मिलियन नागरिक रहतात. तसेच या भागात इस्लामवादी बंडखोरांचे वर्चस्व आहे.
ब्रिटन येथील सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सने म्हटले आहे, की या हवाई हल्ल्यात एक महिला आणि तिच्या सहा मुलांचा मृत्यू झाला. हल्ल्यावेळी हे सर्व जण दक्षिण इदलिबमधील डीर अल-शर्की गावात त्यांच्या घरात होते.
ऑब्झर्व्हेटरीचे प्रमुख रामी अब्दुर्रहमान यांनी सांगितल्यानुसार, हल्ल्यात मृत्यू झालेली सर्व मुले १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. हल्ल्यावेळी घरात नसल्याने त्यांचे वडील बचावले आहेत.