लंडन - इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. यामध्ये दुपारपूर्वीच बोरीस जॉन्सन यांच्या सत्ताधारी हुजूर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पक्षाला आघाडी मिळाली होती. मात्र, ती किरकोळ स्वरूपाची होती. मतदानानंतरच्या एग्झिट पोल्सनी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना जोरदार आघाडी मिळण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, हुजूर पक्षाला दुपारपूर्वीच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. अजून मतमोजणी सुरू आहे.
-
The Conservatives have secured a majority in the House of Commons after winning their 326th seat: UK media #UKElections2019 https://t.co/sgX4sEt7DL
— ANI (@ANI) December 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Conservatives have secured a majority in the House of Commons after winning their 326th seat: UK media #UKElections2019 https://t.co/sgX4sEt7DL
— ANI (@ANI) December 13, 2019The Conservatives have secured a majority in the House of Commons after winning their 326th seat: UK media #UKElections2019 https://t.co/sgX4sEt7DL
— ANI (@ANI) December 13, 2019
जॉन्सन आणि त्यांचा हुजूर पक्ष विजयी झाल्याने आता इंग्लंडचे ब्रेग्झिटमधून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न सुरूच राहतील. तसेच, या विषयावर पुन्हा सार्वमत घेण्याच्या शक्यताही राहणार नाहीत.
एग्झिट पोल्सनी ब्रिटिश संसदेच्या ६५० जागांपैकी ३६८ जागा हुजूर पक्षाला मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. तर, सध्याचा प्रमुख विरोधक असलेला मजूर पक्ष १९१ जागांनी त्यांच्या मागे राहील, असाही अंदाज वर्तवल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
सध्या हुजूर पक्षाला संसद काबीज करण्यासाठी आणि जॉन्सन यांची ब्रेक्झिटची कल्पना यशस्वी करण्यासाठी ३२६ जागांची गरज आहे. या जागा हुजूर पक्षाने खिशात घातल्या आहेत. या ब्रिटनमधील चार वर्षांतल्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. याआधी जून २०१६ मध्ये ब्रेक्झिटवर सार्वमत घेण्यात आले होते.
दरम्यान, मजूर पक्षाचे नेते आणि जॉन्सन यांचे प्रतिस्पर्धी जेरेमी कॉर्बाईन यांनी एग्झिट पोल्सनी मजूर पक्षाच्या जोरदार पराभवाचा अंदाज वर्तवल्यानंतरच पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता.
