कीव - रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा आज 14 वा दिवस आहे. ( Russia Ukraine War 14th day ) रशिया युद्धातून माघार घेण्याचे नाव घेत नाही. त्याच वेळी, युक्रेनमधील परिस्थिती वाईट होत चालली आहे. मात्र, रशियाच्या आक्रमकतेविरुद्ध आपला देश शेवटच्या श्वासापर्यंत लढेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या संसदेला संबोधित करताना ही माहिती दिली. झेलेन्स्की यांनी ब्रिटिश खासदारांना सांगितले की, 'आम्ही हार मानणार नाही आणि हारणारही नाही. याआधी युक्रेनने खार्किवमध्ये रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्हची हत्या केली होती. दुसरीकडे, युक्रेनच्या सुमी शहरात रशियन बॉम्बहल्ल्यात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कीववर मोठ्या हल्ल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्याच वेळी, अमेरिकेने रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घातली आहे.
झेलेन्स्की यांचे ब्रिटिश संसदेत ऐतिहासिक भाषण -
युक्रेनचे 44 वर्षीय नेते झेलेन्स्की यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कनिष्ठ सभागृह 'हाऊस ऑफ कॉमन्स'ला संबोधित करताना ऐतिहासिक भाषण केले. झेलेन्स्की यांचे उभ्या खासदारांनी स्वागत केले. ब्रिटिश संसदेला संबोधित करताना झेलेन्स्की म्हणाले की, त्यांचा देश रशियाच्या आक्रमणाविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. झेलेन्स्की यांनी ब्रिटिश खासदारांना सांगितले की, आम्ही हार मानणार नाही आणि हरणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना उद्देशून झेलेन्स्की म्हणाले की, पाश्चात्य देशांना मदत करण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि बोरिस, मी तुमचा आभारी आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, कृपया या देशावर (रशिया) निर्बंध वाढवा आणि कृपया या देशाला दहशतवादी राष्ट्र घोषित करा. कृपया आमच्या युक्रेनचे आकाश संरक्षित असल्याची खात्री करा. अमेरिकेत रशियन तेलाच्या आयातीवर बंदी आहे
रशियाकडून अमेरिकेच्या तेल आयातीवर बंदी तर अमेरिकेची रशियन तेल गॅस आयतीवर बंदी -
युक्रेन आणि रशिया यांच्यातील लढाई ( Russia Ukraine conflict ) होऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. अनेक देशांनी निर्बंध लादूनही रशियाची आक्रमकता कमी होत नाहीये. ताज्या घडामोडीत, रशियाकडून अमेरिकेच्या तेल आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी एका घोषणेत सांगितले की, आम्ही रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी ( Russian oil import ban in USA ) घालत आहोत.
रशियाकडून युक्रेनमध्ये मानवतावादी युद्धविराम जाहीर -
युक्रेनमधील नागरी लोकसंख्येला बाहेर काढण्यासाठी रशियाने आज सकाळी मानवतावादी युद्धविराम जाहीर केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. स्पुतनिक वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की रशियाने 'शांतता मोड' घोषित केला आहे आणि कीवसह अनेक शहरांमधून मानवतावादी कॉरिडॉर प्रदान करण्यास तयार आहे. रशियनांनी सांगितले की ते चेर्निहाइव्ह, सुमी, खार्किव, मारियुपोल आणि झापोरिझिया येथून कॉरिडॉर देण्यास तयार आहेत. मानवतावादी समन्वय केंद्राचे प्रमुख मिखाईल मिगिन्त्सेव्ह यांनी सांगितले की, रशियाने पुन्हा युक्रेनला नागरिकांच्या परतीच्या मार्गावर सहमती देण्याची ऑफर दिली.
भारतीय ऑपरेशन गंगा यशस्वी -
भारताबद्दल बोलायचे तर, युद्धग्रस्त युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगाद्वारे यशस्वीरित्या विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, त्यांना काहीतरी अघटित होण्याची भीती वाटत होती, परंतु भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे त्यांचे अभियान यशस्वी झाले.
हेही वाचा - International Flights resume: आंतरराष्ट्रीय उड्डाणे 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार