ETV Bharat / international

#SputnikV : पुतीन यांच्या मुलीवर जगातील पहिली 'क्लिनिकल ट्रायल', कोरोनावर लस शोधल्याचा रशियाचा दावा - immunity from the coronavirus

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला असून याची मानवी चाचणी उत्तमरित्या पूर्ण केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लसीची 'क्लिनिकल ट्रायल' आपल्या मुलीवर केल्याची माहिती त्यांनी दिली. लस निर्मितीच्या प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या मानवी चाचणीत सर्व रुग्णांवर त्याचा प्रभाव दिसला असून रोगप्रतीकारक शक्ती वाढल्याचा दावा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. मानवी चाचणीतील अंंतिम क्लिनिकल ट्रायल्समध्ये रुग्णांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी म्हटले.

Russia registers first coronavirus vaccine
#Sputnik: पुतीन यांच्या मुलीवर जगातील पहिली 'क्लिनिकल ट्रायल', कोरोवर लस शोधल्याचा रशियाचा दावा#Sputnik: पुतीन यांच्या मुलीवर जगातील पहिली 'क्लिनिकल ट्रायल', कोरोवर लस शोधल्याचा रशियाचा दावा
author img

By

Published : Aug 12, 2020, 7:15 AM IST

Updated : Aug 12, 2020, 8:09 AM IST

मॉस्को - कोरोनासाठी अधिकृतरित्या लस मंजूर करणारा रशिया जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्याप यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. कोरोनाची लस मंजूर करण्यासाठी त्याच्या ठराविक मानवी चाचण्या पूर्ण करण्याची गरज असते. मात्र, डझनभर क्लिनिकल ट्रायल्स घेऊन रशिया जगाची फसवणूक करत असल्याचा संंशय व्यक्त केला जातोय. असे असले, तरिही राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या लसीची पहिली क्लिनिकल ट्रायल स्वत:च्या मुलीवर केल्याचे सांगितले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला असून याची मानवी चाचणी उत्तमरित्या पूर्ण केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लसीची पहिली चाचणी आपल्या मुलीवर केल्याची माहिती त्यांनी दिली. लस निर्मितीच्या प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या मानवी चाचणीत सर्व रुग्णांवर त्याचा प्रभाव दिसला असून रोगप्रतीकारक शक्ती वाढल्याचा दावा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. मानवी चाचणीतील अंंतिम क्लिनिकल ट्रायल्समध्ये रुग्णांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी म्हटले.

#Sputnik: पुतीन यांच्या मुलीवर जगातील पहिली 'क्लिनिकल ट्रायल', कोरोवर लस शोधल्याचा रशियाचा दावा

अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या दोन प्रौढ मुलींपैकी एकीवर आधीच रोगप्रतिबंधक लस टोचण्यात आल्याचे मान्य केले. या लसीच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या असून कोरोना विषाणू विरोधात रोग प्रतिकारकशक्ती तयार झाल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, अद्याप रशियन वैद्यकीय प्रशासनाने संबंधित लशीच्या सुरक्षितते विषयी किंवा परिणामकारकतेबाबत दावा करण्यास कोणताही पुरावा दिला नाही.

ही लस कार्यक्षम सिद्ध झाली असून शरिरात स्थिर प्रतिकारशक्ती तयार करते, असे पुतीन म्हणाले. 'ज्यांनी हे पहिले पाऊल आपल्या देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी उचलले, त्यांचे आम्ही आभारी असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

Russia registers first coronavirus vaccine
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला असून याची मानवी चाचणी उत्तमरित्या पूर्ण केल्याचे सांगितले

तथापि, रशियातील शास्त्रज्ञांसह अन्य देशांनी याबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. फेज-३ मधील ट्रायल्स पूर्ण न करता रशिया जगाची फसवणूक करत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. लस पहिले कोण आणतो, या स्पर्धेचे हे उत्तम उदाहरण असल्याचे अनेकांनी सांगितले. लस मंजूर होण्यासाठी हजारो लोकांंवर त्याची चाचणी करणे आवश्यक असते. मात्र, अद्याप तसे न झाल्याने या दाव्याबाबत शंका उपस्थित होत आहेत. ही गोष्ट रशियाच्या अंगलटी येऊ शकते, असेही अनेकांचे म्हणणे आहे.

Last Updated : Aug 12, 2020, 8:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.