लंडन - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंट वाढण्याची भीती असताना चिंताजनक माहिती समोर आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या (University of Oxford) संशोधकांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यात आला. फायझर आणि अॅस्ट्राजेनेका या कंपन्यांनी तयार केलेली कोरोना लस ही अल्फा व्हेरियंट तुलनेत कोरोना विषाणा डेल्टा व्हेरियंटवर कमी प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
फायझर बायोएनटेक व्हॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनकाची लस ही कोरोनाच्या नवीन व्हेरियंटविरोधात सुरक्षा देत असल्याचेही ऑक्सफोर्डच्या संशोधनात म्हटले आहे.
हेही वाचा-ट्विटरकडून अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचे ट्विटर अकाउंट बंद
असे करण्यात आले संशोधन
संशोधकांनी 1 डिसेंबर 2020 ते 16 मे 2021 मध्ये 18 वर्षांहून अधिक वयोगटाच्या 3,84,543 व्यक्तींचे नाक आणि घश्यामधून स्वॅब घेतला. त्यामधील 25,80,021 परीक्षणांचे विश्लेषण करण्यात आले. या कालावधीत संशोधकांनी 17 मे 2021 आणि 1 ऑगस्ट 2021 दरम्यान 3,58,983 लोकांच्या स्वॅबचे परीक्षण करण्यात आले. कोरोना झाल्यानंतर लस घेतलेले लोक हे लस घेण्यापूर्वी कोरोना झालेल्या लोकांहून अधिक सुरक्षित असल्याचे अभ्यासात आढळले.
हेही वाचा-अलकायदाच्या दहशतवाद्यांचे लखनौसह कानपूरमध्ये कनेक्शन... एनआयएकडून तपास सुरू
कोरोना लसीकरणानंतर किती जणांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला?
कोरोनाचे दोन डोस घेणार आणि कोरोनाचे दोन डोस न घेणाऱ्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंट विषाणुचे समान प्रमाण आढळले आहे. ऑक्सफोर्डचे प्राध्यापक सारा वॉकर म्हणाले, की कोरोना लसीकरणानंतर किती जणांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला, याची माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचा-झायडस लशीच्या आपत्कालीन परवानगीकरिता केंद्राकडे सात ते आठ दिवसांत करणार अर्ज
डेल्टा विषाणुवर अॅस्ट्राजेनेकाच्या लशीचा कमी प्रभाव
युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमधील सहयोगी प्राध्यापक सायमन क्लार्क म्हणाले, की दोन लशींची कामगिरी कशी आहे, हे आकडेवारीतून दिसून येते. डेल्टा व्हेरियंटने फायझर आणि एस्ट्राजेनेकाच्या डोसचा प्रभाव कमी केला आहे. डेल्टामुळे अॅस्ट्राजेनेका लशीचा प्रभाव खूप कमी झाल्याची चिंताही क्लार्क यांनी व्यक्त केले. कोरोना झाल्यानंतर नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यासही पुरेशी सुरक्षा मिळणार नाही. फायझरच्या डोसमधून अॅस्ट्राजेनेकाच्या तुलनेत सुरुवातील अधिक सुरक्षा मिळाल्याचे दिसून आले. मात्र, पाच महिन्यानंतर फायझरमधून निर्माण झालेली प्रतिकारक्षमता ही अॅस्ट्राजेनेकाएवढीच असल्याचे दिसून आले.
फायझर आणि अॅस्ट्राझेनका लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 6 आठवड्यानंतर शरीरामधील अँटीबॉडीज स्तर कमी व्हायला सुरुवात होते. 10 आठवड्यात 50 टक्के पेक्षा जास्त अँटिबॉडीज कमी होऊ शकतात. द लँसेट मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालामध्ये हा दावा जुलैमध्ये करण्यात आला. फायझर- अॅस्ट्राझेनकाचे दोन डोस घेतल्यानंतर पेशींची वाढ ज्या गतीने वाढते, 2 ते 3 आठवड्यानंतर तेवढ्याच गतीने त्या घटायला सुरुवात होते. संशोधन अभ्यासमध्ये हे समोर आले आहे, की ही लस कोरोना व्हायरसच्या विरोधात अत्यंत परिणामकारक असल्याचे संशोधन अहवालात म्हटले.
सातत्याने कोविडवर सुरू आहे लँसेंटचे संशोधन
लँसेट या संशोधन संस्थेने कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा शोध लागण्यापूर्वीच एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात असा दावा करण्यात आला होता की, फायझर आणि आणि अँस्ट्राझेनका लसीचा एक डोस 65 वयापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांना जवळपास 60 टक्के सुरक्षा देऊ शकते. या शिवाय भारत आणि इंग्लंड मधील संशोधकांनी दोन वेगवेगळ्या संशोधनातून हे जाणून घेतले होते की अँस्ट्राझेनका-ऑक्सफोर्ड या कोविड-19 लसीचे डोस घेणाऱ्या 11 जणांमध्ये दुर्लभ प्रकारचे न्यूरोलॉजिकल आजार उद्धभवले, ज्याला गुलेन-बॅरे सिंड्रोम नाव देण्यात आले आहे. सध्या नवीन संशोधनाचे निष्कर्षही समोर आले आहेत,त्या पार्श्वभूमीवर सरकारला आता हे निश्चित करावे लागणार आहे, की बूस्टर डोसची गरज आहे किंवा नाही.
दरम्यान, भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने अॅस्ट्राजेनकाच्या लशीचे कोव्हिशिल्ड या नावाने उत्पादन केले आहे.