बर्लिन - या महिन्याच्या सुरुवातीस ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाविषाणूच्या नवीन प्रकाराबद्दल नुकत्याच झालेल्या एका मीडिया अहवालामध्ये म्हटले आहे की, हा विषाणू नोव्हेंबरपासूनच जर्मनीमध्ये आहे.
सोमवारी जर्मन राष्ट्रीय दैनिक वृत्तपत्र डाय वेल्टमध्ये प्रकाशित झालेल्या सिन्हुआ न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, हॅनोव्हर मेडिकल स्कूलच्या संशोधकांना नोव्हेंबरच्या सुमारास कोरोनाविषाणू संसर्ग झालेल्या वृद्ध रुग्णाच्या नमुन्यात या विषाणूचे नवीन रूप सापडले होते. नंतर ही व्यक्ती मरण पावली.
हेही वाचा - जपानमध्ये अनिवासी परदेशी नागरिकांना बंदी, कोरोनाच्या 'युके स्ट्रेन'चे बाधित रुग्ण सापडल्यानंतर निर्णय
दक्षिण-पश्चिम राज्यातील बाडेन-वार्टेमबर्गच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, 24 डिसेंबर रोजी जर्मनीमध्ये नवीन प्रकारच्या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. संसर्ग झालेली ही महिला ब्रिटनहून परतली होती.
जर्मनीमध्ये कोविड - 19 च्या एकूण घटनांची संख्या सध्या 16 लाख 72 हजार 643 आहे. आतापर्यंत 30 हजार 508 लोकांचा बळी गेला आहे.
हेही वाचा - मध्य-पूर्व आशियामध्ये कोरोनाच्या इंग्लंडमधील स्ट्रेनचा शिरकाव; जॉर्डनमध्ये आढळले दोन रुग्ण