रोम- जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 लाख 59 हजार 63 झाला असतानाच आत्तापर्यंत 75 हजार 907 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 2 लाख 93 हजार रुग्ण पूर्णत: बरेदेखील झाले आहेत.
इटलीमध्ये सर्वांत जास्त 16 हजार 523 जणांचा मृत्यू झाला असून अमेरिका आणि स्पेनने 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत 10 हजार 943 जणांचा मृत्यू झाला असून स्पेनमध्ये 13 हजार 798 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 8 हजार जणांचा मृत्यू झाला असून इंग्लडनेही 5 हजारांचा टप्पा पार केला आहे.
सर्वात जास्त रुग्ण कोणत्या देशात?
अमेरिका - 3 लाख 67 हजार रुग्ण
स्पेन - 1 लाख 40 हजार रुग्ण
इटली - 1 लाख 32 हजार रुग्ण
जर्मनी 1 लाख 3 हजार रुग्ण
फ्रान्स - 98 हजार रुग्ण
इंग्लड - 51 हजार रुग्ण