वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेनच्या (Ukraine and Russia Conflict) यांच्यातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सोमवारी सिक्युरिटी कॉल घेणार आहेत. यात रशिया युक्रेनमधील वादाबाबत चर्चा करणार असल्याचेही व्हाईट हाऊसच्या पत्रकात म्हटले आहे.
11:15 AM [16:15 GMT] रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या ताज्या घडामोडींवर चर्चा आणि इतर घडामोंडींवर संवाद साधण्यासाठी राष्ट्रपती मित्र राष्ट्र आणि इतर भागीदारांसोबत सिक्युरिटी कॉल द्वारे चर्चा करतील, असे व्हाईटहाऊसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रशियावर निर्बंधांचा दवाब
डोनबासमधील प्रजासत्ताकच्या नागरिकांच्या ( People's republics in Donbas ) विनंतीनंतर युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंधांचा दबाव वाढवला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने The Russian Defense Ministry सांगितले की हे ऑपरेशन केवळ युक्रेनच्या ( infrastructure of Ukraine ) लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे आणि नागरी लोकसंख्येला यामुळे कोणताही धोका नाही.
रशियन आणि कीव शिष्टमंडळाची चर्चा
मॉस्कोचे म्हणणे आहे की युक्रेनवर कब्जा करण्याची त्याची कोणतीही योजना नाही आणि त्याच्या ऑपरेशनचा उद्देश नागरी लोकसंख्येला नरसंहारापासून वाचवणे आणि डोनेस्तक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक (डीपीआर आणि एलपीआर) (Donetsk and Luhansk People's Republics ) (DPR and LPR) ला मुक्त करणे, युक्रेनचे नि:शस्त्रीकरण आणि विनाशीकरण हेच आहे. सोमवारी युक्रेनियन सीमेवर बेलारूसमधील गोमेल प्रदेशात रशियन आणि कीव शिष्टमंडळाची चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - Russia Ukraine Crisis : रशियाने युक्रेनच्या खार्किवमधील गॅस पाईपलाइन उडवली