लंडन - आलिशान आणि महागड्या गाड्या बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली बेंटले कंपनी आता इलेक्ट्रिक कार तयार करणार आहे. 2025 पर्यंत बेंटलेची ही गाडी बाजारात येईल, अशी घोषणा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - आता कॉफी प्यायल्यानंतर कपही खा!
इलेक्ट्रिक प्रकारातील गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजिनपेक्षा या गाडीचे इंजिन वेगळे बनवण्यात येणार आहे. बेंटलेच्या 'मुलसॅन' या गाडीच्या चाकांच्या रचनेत बदल करून इलेक्ट्रिक कारसाठी चाकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न इंजिनिअर्स करत असल्याची माहिती बेंटलेतर्फे देण्यात आली.