जेरुसलेम - पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संसदेत बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने सरकार स्थापन करू शकत नसल्याची घोषणा केली आहे. इस्रायलमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर बहुमत मिळवू शकत नसल्याचे त्यांनी राष्ट्रपती रेवेन रिवलिन यांना कळवले आहे.
इस्रायलमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. याविषयी नेतान्याहू यांनी स्वतःच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून याविषयीची व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या प्रयत्नांतून माघार घेत असल्याचे म्हटले आहे.
आपले राजकीय प्रतिस्पर्धी आणि माजी सैन्य प्रमुख बेनी गँटस यांच्यासह युती करून सरकार स्थापनेच्या प्रयत्नांत वारंवार निराशा हाती लागल्याचे नेतान्याहू यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. त्यांनी 'जनादेश' सिद्ध करण्याच्या प्रयत्नांतून माघार घेत असल्याचे राष्ट्रपती रिवलिन यांना कळवत आपला प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले आहे.
येत्या काळात नेतान्याहू यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक मोठे नेते यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.