लंडन - प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार बँक्सी यांनी ब्रिटिश संसदेत चिंपांझी असलेले छायाचित्र काढले होते. या छायाचित्राला तब्बल १० दशलक्ष पाऊंड अशी विक्रमी किंमत मिळाली आहे. बँक्सी यांच्या दुसऱ्या कोणत्याही कलाकृतीला एवढी किंमत मिळाली नव्हती.
एक दशलक्ष पाऊंड एवढ्या किंमतीवर सुरू झालेली बोली अवघ्या १३ मिनिटांतच ८.५ दशलक्ष पाऊंड्सला पोहोचली. ८.५ दशलक्ष पाऊंड्स अशा सर्वोच्च बोलीवर या चित्राची विक्री झाली. आवश्यक ते शुल्क जोडले असता ९.९ दशलक्ष पाऊंड्स ही एकूण किंमत झाली. लिलाव करणाऱ्या कंपनीला या छायाचित्राची किंमत दीड ते अडीच दशलक्ष पाऊंड्स एवढी होईल अशी अपेक्षा होती.
बँक्सी यांनी याआधी काढलेल्या सर्वात महागड्या चित्राची किंमत १.४ दशलक्ष पाऊंड्स एवढी होती. त्यामुळे या चित्राला मिळालेल्या किंमतीमुळे बँक्सीच्या पूर्वीच्या चित्राच्या किंमतीचा विक्रम मोडला गेला आहे. बँक्सी यांनी या चित्राला मिळालेल्या किंमतीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र, आता हे चित्र आपल्याकडे नसेल याबद्दल त्यांनी ट्विटवर दुःख देखील व्यक्त केले आहे.
हेही वाचा : इराकमध्ये सरकार विरोधी आंदोलनात ३४ ठार, दीड हजारांहून अधिक जखमी