टोकियो - चीनच्या आक्रमक भूमिकेला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानदरम्यान 'चौकोनी' बैठक मंगळवारी जपानमध्ये सुरू झाली.
'कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे येणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीचा सामना करण्यासाठी त्यांचा 'फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक' हा उपक्रम महत्त्वाचा आहे,' असे जपानचे नवे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांनी मंगळवारी अमेरिका आणि इतर मुत्सद्दी लोकांशी झालेल्या बैठकीत सांगितले.
अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 'क्वाड ग्रुप' म्हणून ओळखल्या जाणार्या इंडो-पॅसिफिक देशांचे परराष्ट्र मंत्री कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्यांच्या पहिल्याच चर्चेसाठी टोकियोमध्ये जमले आहेत.
'आंतरराष्ट्रीय समुदायाला कोरोना साथीच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, आता अशी वेळ आली आहे की, आपण शक्य तितक्या देशांशी समन्वय अधिक दृढ केले पाहिजेत. जेणेकरून आपला दृष्टिकोन सामायिक होईल,' असे सुगा म्हणाले.
सुगा यांनी त्यांच्या आधीचे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या पद्धतीनेच सुरक्षा आणि मुत्सद्दी भूमिका घेण्याचे वचन देत 16 सप्टेंबरला पदभार स्वीकारला.
एफएआयपीला प्रोत्साहन देण्याऱ्यांपैकी अॅबे हे एक मुख्य प्रेरक शक्ती होते, असे सांगत सुगा यांनी त्यांना 'या प्रदेशातील शांती आणि समृद्धीची दृष्टी' असे म्हटले आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मेरीस पेन, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर आणि त्यांचे जपानचे पंतप्रधान तोशिमित्सू मोतेगी यांनी मंगळवारी सुगा यांच्या अनुपस्थितीतच चर्चा पार पाडली.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आणि कोरोना विषाणू प्रसार, व्यापार, तंत्रज्ञान, हाँगकाँग, तैवान आणि मानवी हक्कांबाबत अमेरिका आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर काही आठवडे आधी ही चर्चा झाली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड -19 च्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या दक्षिण कोरिया आणि मंगोलियाच्या त्यानंतरच्या नियोजित भेटी रद्द झाल्या असल्या तरी पॉम्पिओ 'चौकोनी बैठकी'त हजर आहेत. सोमवारी उपचारांनंतर अध्यक्षांना सोडण्यात आले आणि ते व्हाईट हाऊसमध्ये परत आले.
महत्त्वाचे मुद्दे -
- चीन आणि भारत यांच्यात हिमालयीन सीमेवरून निर्माण झालेल्या वादावरही या बैठकी चर्चा झाली. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील संबंधही अलीकडच्या काही महिन्यांत बिघडले आहेत.
- दरम्यान, जपानच्या अधिपत्याखालील ईस्ट चायना सीमधील सेंकाकू बेटांवरील चीनच्या दाव्याबद्दल जपानने चिंता केली आहे. या बेटांना चीनने दायोवू असे म्हटले आहे. येथील चीनच्या वाढत्या लष्करी कारवायांना जपानही राष्ट्रीय सुरक्षेला धोका मानतो. जुलैमध्ये जपानच्या वार्षिक संरक्षण धोरणात चीनवर साऊथ चायना सीमधील एकतर्फी स्थिती बदलण्याचा आरोप केला होता. येथे चीनने मानवनिर्मित बेटे तयार करून तेथे सैन्य तैनात केले आहे. येथील समुद्रावरील सर्व प्रमुख मत्स्यव्यवसाय आणि जलमार्गांवर चीन आपला दावा सांगत आहे.
'आपण चीन आणि रशियासह शेजार्यांशी स्थिर संबंध प्रस्थापित करून जपान-अमेरिकेच्या युतीवर आधारलेल्या मुत्सद्दी धोरणाचा पाठपुरावा करू आणि 'एफओआयपीला रणनैतिकदृष्ट्या प्रोत्साहन देऊ', असे अॅबे यांच्या नेतृत्वात मुख्य कॅबिनेट सेक्रेटरी असलेल्या सुगा यांनी सोमवारी जपानी माध्यमांना सांगितले.