ETV Bharat / international

व्हिएतनाममधील मोलावे वादळामध्ये 27 ठार, 50 बेपत्ता

author img

By

Published : Oct 31, 2020, 4:36 PM IST

मोलावे वादळाचा जोर आता काहीसा थंडावला आहे. वादळापासून वाचण्यासाठी उपाययोजना, लोकांचा शोध व बचावकार्य करण्यासाठी 10 हजार 420 लष्करी अधिकारी व सैनिकांना सेवेत आणले गेले आहे. व्हिएतनाममधील हे वादळ गेल्या 20 वर्षातील एक जोरदार आणि मोठे वादळ आहे.

व्हिएतनाम
व्हिएतनाम

हनोई - व्हिएतनाममध्ये मोलावे वादळामुळे भूस्खलन, दरडी कोसळल्यामुळे आणि पुरामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 जण बेपत्ता आहेत आणि 67 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, क्वांग नाम, न्हे आन, डाक लक आणि जिया लाई प्रांतातील लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, असे देशाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नियंत्रणासाठी काम करणाऱ्या केंद्रीय संचलन समितीने म्हटले आहे. बेपत्ता आणि जखमींची नोंद प्रामुख्याने क्वांग नाम आणि बिन्ह दिन प्रांतात झाली आहे, असे समितीने पुढे म्हटले आहे.

हेही वाचा - फिलिपाईन्समध्ये 'टायफून मोलावे'च्या बळींची संख्या 22 वर

या नैसर्गिक आपत्तीमुळे काही राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक रस्ते आणि 63 पुलांचे नुकसान झाले आहे, असे समितीने म्हटले आहे.

हेही वाचा - तुर्कस्तानात भूकंप : मृतांची संख्या 24 वर, एक हजाराहून अधिक जखमी, बचावकार्य सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.