ETV Bharat / international

अफगाणिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 30 ठार, 24 जखमी - अफगाणिस्तान गझनी कार बॉम्बस्फोट न्यूज

गझनी सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक बाझ मोहम्मद हेमात यांनी या हल्ल्यात जखमींच्या आणि मृतांच्या आकड्याची कबुली दिली. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अद्याप कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांना दोषी धरले आहे.

अफगाणिस्तान आत्मघातकी बॉम्बस्फोट न्यूज
अफगाणिस्तान आत्मघातकी बॉम्बस्फोट न्यूज
author img

By

Published : Nov 29, 2020, 4:56 PM IST

काबूल - अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील लष्करी छावणीत रविवारी झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात तब्बल 30 सैनिक ठार झाले. तर, 24 हून अधिक जखमी झाले. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

गझनी सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक बाझ मोहम्मद हेमात यांनी सिन्हुआ वृत्तसंस्थेशी बोलताना या हल्ल्यात जखमींच्या आणि मृतांच्या आकड्याची कबुली दिली. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पाकिस्तान : वाहनावर झालेल्या गोळीबारात 4 ठार

एका सुरक्षा अधिकाऱ्याने सिन्हुआला सांगितले की, हा स्फोट एका आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणला होता. हल्लेखोराने गझनी शहराजवळील सैन्याच्या छावणीत स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणला.

'या हल्ल्यात ठार झालेले आणि जखमी झालेल्या सैन्य जवान हे अफगाण नॅशनल आर्मी (एएनए) च्या बटालियनचे आहेत. पूर्वी ही सुविधा पोलिस दलाच्या मालकीची होती, पण आता ते एएनएच्या बटालियनमध्ये बदलले गेले आहे. त्यामुळे हे सर्व पीडित एएनएचे सैनिक होते,' असे ते म्हणाले.

पूर्वीच्या अहवालांमध्ये असे म्हटले होते की, मारले गेलेले आणि जखमी झालेले सर्वजण पोलीस कर्मचारी होते.

अद्याप कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांना दोषी धरले आहे.

हेही वाचा - काबूलमध्ये रॉकेट हल्ल्यात 6 ठार, 25 हून अधिक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.