ETV Bharat / international

पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? शोटुल जिल्हा ताब्यात घेतल्याचा दावा

author img

By

Published : Sep 3, 2021, 12:30 PM IST

तालिबानने पंजशीरमधील शोटुल जिल्ह्याचे केंद्र आणि पंजशीर सैनिकांच्या 11 चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तर अहमद मसूद यांनी हा दावा फेटाळला असून तालिबानची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे म्हटलं आहे.

Panjshir
पंजशीर

काबूल - अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यातील शोटुल जिल्ह्याचे केंद्र ताब्यात घेतल्याचा दावा तालिबान्यांनी केला आहे. पंजशीरच्या सैनिकांच्या पराभव करत जिल्ह्यातील पंजशीर सैनिकांच्या 11 चौक्यावर ताबा मिळवल्याचे त्यांनी म्हटलं आहे. लढाईत तालिबानकडून पंजशीरचे 34 सैनिक ठार झाल्याचे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनमुल्ला समनगनी यांनी सांगितलं. मात्र, पंजशीरचे प्रमुख अहमद मसूद यांनी सैनिकांच्या मृत्यूचा दावा फेटाळला असून तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटलं.

गुरुवारी रात्री पंजशीरचे सैनिक आणि तालिबान्यांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात 350 तालिबानी ठार झाले आहेत. तालिबान्यांनी सिराज डोंगररांगातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंजशीरच्या सैनिकांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. तालिबान्यांचे मृतदेह तसेच पडले असून त्यांनी फक्त 40 मृतदेह परत नेले आहेत, असे पंजशीरचे प्रवक्ते फहीम दश्ती यांनी सांगितले. पंजशीर अद्याप अभेद्य असल्याचे त्यांनी म्हटलं.

अमेरिकेन सैन्यांच्या माघारीनंतर पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. आता तालिबानने अहमद मसूद यांच्या नियंत्रणात असलेल्या पंजशीर खोऱ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, अफगाणिस्तानात गृहयुद्ध सुरू झाल्यापासून पंजशीर खोरे अभेद्य राहिले आहे. तालिबानला कधीच पंजशीरवर ताबा मिळवता आलेला नाही.

पंजशीर तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभा -

पंजशीर प्रांत अफगाणिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक आहे. काबूलपासून 150 किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. या प्रांताचे रक्षण पंजशीरचे शेर अशी ओळख असलेले अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वात नॉर्दन अलायन्स करत आहे. अहमद मसूद हे अहमद शाह मसूद यांचे पुत्र असून तालिबान्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आपल्या वडिलांचा तालिबानविरोधी प्रतिकाराचा वारसा ते पुढे नेत आहेत. मुकाबला करू, पण शरण जाणार नाही, असे अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. तालिबान्यांच्या विरोधात 1996 मध्ये अहमद शाह मसूद यांनीच नॉर्दन अलायन्सची पायाभरणी केली होती. नॉर्दर्न अलायन्स हा मजबूत सैनिकी गट आहे. याच्यासमोर तालिबानी टिकाव धरत नाहीत.

हेही वाचा - Lion of Panjshir : 'मुकाबला, पण शरण नाही'; तालिबानविरोधात पाय रोवून अहमद मसूद अन् त्यांची 'नॉर्दर्न अलायन्स'

हेही वाचा - अफगाणिस्तानमधील अभेद्य 'पंजशीर प्रांत'; येथे पायही नाही ठेवू शकला तालिबान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.