हैदराबाद - सौदी अरेबियाने सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना तबलिगी (Saudi Arabian ban on Tablighi Jamaa)जमातवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियाचे इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ अब्दुल लतीफ अल अलशेख यांनी मशिदीच्या मुएझिदला शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान आदेशाची माहिती देण्याचे आणि तबलिगी गटाला चेतावणी देण्याचे निर्देश दिले. यापुढे शुक्रवारच्या नमाजच्या वेळी लोकांना तबलिगी जमातला भेटण्याची गरज नाही, त्यांच्याशी कोणताही संपर्क ठेवू नये, असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.
-
His Excellency the Minister of Islamic Affairs, Dr.#Abdullatif Al_Alsheikh directed the mosques' preachers and the mosques that held Friday prayer temporary to allocate the next Friday sermon 5/6/1443 H to warn against (the Tablighi and Da’wah group) which is called (Al Ahbab)
— Ministry of Islamic Affairs 🇸🇦 (@Saudi_MoiaEN) December 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">His Excellency the Minister of Islamic Affairs, Dr.#Abdullatif Al_Alsheikh directed the mosques' preachers and the mosques that held Friday prayer temporary to allocate the next Friday sermon 5/6/1443 H to warn against (the Tablighi and Da’wah group) which is called (Al Ahbab)
— Ministry of Islamic Affairs 🇸🇦 (@Saudi_MoiaEN) December 6, 2021His Excellency the Minister of Islamic Affairs, Dr.#Abdullatif Al_Alsheikh directed the mosques' preachers and the mosques that held Friday prayer temporary to allocate the next Friday sermon 5/6/1443 H to warn against (the Tablighi and Da’wah group) which is called (Al Ahbab)
— Ministry of Islamic Affairs 🇸🇦 (@Saudi_MoiaEN) December 6, 2021
तबलिगी जमात काही दावा करत असला तरी तबलिगी जमात दहशतवाद्यांचा रस्ता असून समाजासाठी धोकादायक असल्याचे सौदी सरकारने म्हटले आहे. अनेक दहशतवादी कारवायांच्या चौकशीत ही तबलिगी संघटना समोर आली आहे. इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेत दहशतवादी कारवायासाठी तबलिगी छुपा पाठिंबा दिल्याचा संघटनेवर आरोप झाला आहे.
सुमारे 94 वर्षांपूर्वी 1926 मध्ये देवबंदी इस्लामिक विद्वान मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी तबलिगी जमात सुरू केली होती. इस्लामिक विद्वानांनी धार्मिक सुधारणा चळवळ म्हणून त्याचा प्रसार केला. तबलिगी जमातचे काम विशेषत: इस्लामच्या अनुयायांना धार्मिक प्रवचन देणे हे आहे. कोरोनाच्या काळात भारतात तबलिगी जमात खूप लोकप्रिय होती. निजामुद्दीन मरकजमध्ये जमलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.
प्यु रिसर्च सेंटरनुसार तबलिगी जमात पश्चिम युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका आशियासहत जगातील १५० देशात सक्रिया आहे. दक्षिण आशियातील इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, पाकिस्तान आणि थायलँडमध्ये तब्लिगी जमातचे मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या आहे.