मॅास्को - जगभरामध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेट केले आहे. दरम्यान ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सरकारशी संपर्कात राहणार आहेत.
मिखाइल मिशुस्तिन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना व्हिडिओ कॉलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. आजारातून लवकरच बरे होणाच्या शुभेच्छा पुतीन यांनी त्यांना दिल्या. तुर्तास मिखाइल मिशुस्तिन यांचे कामकाज सध्या उपपंतप्रधान अँड्री बेलूसोव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 54 वर्षीय मिशुस्तिन हे माजी कर प्रमुख होते. जानेवरीमध्ये त्यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सध्या रशियामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. दररोज 7 हजार 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद होत आहे. देशातील एकूण प्रकरणांची संख्या 1 लाख 6 हजार 498 वर पोहोचली, ज्यात 1 हजरा 73 मृत्यूंचा समावेश आहे. रशियामध्ये मार्चमध्ये लागू करण्यात आलेले लॉकडाऊन 11 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे.