इस्लामाबाद- पाकिस्तानात काहीही होऊ शकते असे म्हटले जाते. पण आता निसर्गानेही एक आश्चर्यकारक प्रकरण पाकिस्तानमध्ये घडवून आणले आहे. एका महिलेने एकाच वेळी तब्बल सात मुलांना जन्म दिला आहे. या महिलेसह सर्व मुले निरोगी आहेत. त्यातील एकाला आयसीयूत ठेवण्यात आले आहे. या मुलांपैकी चार मुले आणि तीन मुली आहेत. या मुलांची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
-
A mother has given birth to 7 babies in Abbottabad, the seventh baby is in NICU. The mother is admit in hospital and being treated through the Sehat Card Plus Programme. KP Health Department extends all the well wishes to the family. pic.twitter.com/QKRHBmh0M4
— Health Department KP (@HealthKPGovt) October 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A mother has given birth to 7 babies in Abbottabad, the seventh baby is in NICU. The mother is admit in hospital and being treated through the Sehat Card Plus Programme. KP Health Department extends all the well wishes to the family. pic.twitter.com/QKRHBmh0M4
— Health Department KP (@HealthKPGovt) October 16, 2021A mother has given birth to 7 babies in Abbottabad, the seventh baby is in NICU. The mother is admit in hospital and being treated through the Sehat Card Plus Programme. KP Health Department extends all the well wishes to the family. pic.twitter.com/QKRHBmh0M4
— Health Department KP (@HealthKPGovt) October 16, 2021
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे असलेल्या एबटाबाद शहरात ही घटना घडली आहे. या महिलेवर येथील जिन्ना इंटरनॅशनल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलांच्या वडिलांचे नाव यार मोहम्मद आहे. यार यांनी सांगितले की, पत्नी गर्भवती होती तेव्हा तपासादरम्यान आम्हाला समजले की एकापेक्षा जास्त मुले आहेत. परंतु प्रसुतीनंतर समजले की चक्क सात मुले आहेत.
मुलांचे वडील यार म्हणाले, की पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा आमची धाकधुक वाढली होती. प्रसुती कशी होईल याची चिंता लागून रहिली होती. डॉक्टरांच्या टीमने हॉस्पिटलमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने महिलेवर उपचार सुरू केले. अल्ट्रासाऊंड अहवालात आढळून आले की महिलेच्या पोटात पाच मुले आहेत. यानंतर ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागला. महिला आणि मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, एका मुलावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. इतर सहाही मुले सुखरुप आहेत.