कराची - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांना भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे. अफगाणी नागरिक हे युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी मानवी तस्करांचे व्यवसाय चांगलेच वाढले आहेत.
तालिबानी हे काबुलमध्ये जण्यापूर्वी अफगाणिस्तानच्या सीमेवरून 1 हजार लोक हे गेल्या आठवड्यात पाकिस्तानात पोहोचले. ही माहिती हमीद गुल याने दिली आहे. अफगाणी नागरिकाला पाकिस्तानात नेण्यासाठी किती पैसे घण्यात आले, याची त्याने माहिती दिलेली नाही.
हेही वाचा-जम्मू काश्मीर : राजौरीतील चकमकीत दहशतवादी ठार, सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला वीरमरण
बलोचिस्तान प्रांतानजीक असलेल्या शमन, शाघी आणि बदानी येथून मानवी तस्करी वाढल्याचे सूत्राने सांगितले. क्वेट्टा येथे साक्षरतेचे मासिक चालविणारे डॉ. शाह मोहम्मद मॅर्री म्हणाले, की तालिबानने अफगाणिस्तान घेण्यापूर्वी मानवी तस्करी वाढली आहे. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात लोंढे जात आहेत. चालू वर्षात 55 हजार अफगाणी हे पाकिस्तानमध्ये बलोचिस्तानमधून गेले आहेत. त्यामध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. त्यांना अफगाणिस्तानमधील युद्ध आणि संघर्षापासून दूर जायचे आहे. पाकिस्तानात जाणारे अफगाणी बहुतांश हे शिया मुस्लिम किंवा ताजिक्स आहेत.
हेही वाचा-मुनव्वर रानाकडून तालिबानचे समर्थन, म्हणाले भारतात रामराज नाही, कामराज!
युद्धग्रस्त अफगाणिस्तानात पूर्णपणे तालिबानचे वर्चस्व
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील अनेक व्हिडिओ समोर येत आहे. तालिबानी अत्याचार करतील या भीतीने येथील नागरीक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर तेथील परिस्थिती बदलली आहे. जीवाच्या भीतीने अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, युद्धग्रस्त अफगाणिस्तानात पूर्णपणे तालिबानचे वर्चस्व मिळविले आहे.
हेही वाचा-ट्विटरकडून अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचे ट्विटर अकाउंट बंद
मानवी संकट अधिक गडद
या सर्व परिस्थितीत मानवी संकट अधिक गडद होण्याची भीती अफगाणिस्तानातील जागतिक अन्न उपक्रमाच्या प्रमुख मेरी एलेन मॅकग्रोर्टी यांनी व्यक्त केली आहे. अन्न आयातीच्या अडचणींशिवाय देशाच्या 40 टक्के भागात दुष्काळाने पिके नष्ट झाली आहे. अनेक नागरिक हे उद्यानांसारख्या खुल्या मैदानात वास्तव्यास आहेत. सध्या अफगाणिस्तानला मदतीची सर्वाधिक गरज आहे. आंतररराष्ट्रीय समुदायाने आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना भक्कम सहकार्य केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.