ETV Bharat / international

पाकच्या कराची हवाई क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद - आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक

28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत कराची हवाई हद्दीतून सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे. कोणत्या कारणामुळे बंदी घालण्यात आली, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पण पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

विमान वाहतूक
author img

By

Published : Aug 28, 2019, 2:15 PM IST

कराची - पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने (सीएए) ही नोटीस काढली. यानुसार, कराचीच्या हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्ग २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान बंद राहणार आहेत. कोणत्या कारणामुळे बंदी घालण्यात आली, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पण पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

हेही वाचा - आर्टिकल ३७० वरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे ५ सदस्यीय घटनापीठ

28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत कराची हवाई हद्दीतून सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे. 'पाकिस्तानी पंतप्रधान त्यांच्या संपूर्ण हवाई हद्दीतील प्रवास भारतासाठी बंद करण्याच्या विचारात आहेत. अफगाणिस्तानशी व्यापार करण्यासाठी भारताला पाकच्या हवाई हद्दीचा वापर करावा लागतो. याविषयी निर्णय घेण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात आहे,' असे ट्विट पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी केले होते.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाची येचुरींना जम्मू-काश्मीरला जाण्याची परवानगी

याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला पोहोचला होता. त्यावेळीही भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने हवाई हद्द बंदी लागू केली होती. ती बंदी मागील महिन्यात उठवण्यात आली होती.

Intro:Body:

pakistan partially shut karachi airspace till aug 31

pakistan news, karachi airspace news, article 370, international air traffic, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, कराची हवाई क्षेत्र

---------------

पाकच्या कराची हवाई क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद

कराची - पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने (सीएए) यांनी ही नोटीस काढली. यानुसार, कराचीच्या हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्ग २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान बंद राहणार आहेत. कोणत्या कारणामुळे बंदी घालण्यात आली, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पण पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत कराची हवाई हद्दीतून सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे. 'पाकिस्तानी पंतप्रधान त्यांच्या संपूर्ण हवाई हद्दीतील प्रवास भारतासाठी बंद करण्याच्या विचारात आहेत. अफगाणिस्तानशी व्यापार करण्यासाठी भारताला पाकच्या हवाई हद्दीचा वापर करावा लागतो. याविषयी निर्णय घेण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात आहे,' असे ट्विट पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी केले होते.

याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला पोहोचला होता. त्यावेळीही भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने हवाई हद्द बंदी लागू केली होती. ती बंदी मागील महिन्यात उठवण्यात आली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.