काबूल - अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने काबुल विद्यापीठावरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मोहम्मद आदिल याला फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या हल्ल्यात 22 जण ठार झाले होते.
शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या इतर पाच जणांना वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांवर विविध कलमांखाली खटले चालवले गेले.
हेही वाचा - बैरूत : नवीन वर्षाच्या उत्सवांतील गोळीबारांमुळे तीन विमानांना लागल्या गोळ्या
उपाध्यक्ष अमरउल्लाह सालेह यांच्या म्हणण्यानुसार, पंजशीर प्रांतामधील रहिवासी आदिल हक्कानी याला नेटवर्कचा सदस्य सनादुल्ला याने हे काम दिले होते.
हल्ल्याच्या काही दिवसानंतर आदिलला अटक करण्यात आली. 2 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या दोन बंदूकधार्यांच्या या हल्ल्यात 22 लोक ठार आणि जवळपास 40 जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार