काबूल - काबूलच्या पूर्व भागात अज्ञात व्यक्तीने एका अफगाणिस्तानी पत्रकाराची गोळी झाडून हत्या केली आली. मीना मंगल असे हत्या झालेल्या महिला पत्रकाराचे नाव आहे.
मीना मंगल या काबुल येथील स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम करत होत्या. रविवारी सकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
एका अहवालानुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून १५ पत्रकारांचा खून झाला आहे. यातील नऊ पत्रकार हे एकाच दिवशी मारले गेले होते.