ETV Bharat / international

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित चीनमधील कार्यक्रम रद्द - R-Day ceremony in china

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त चीनमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. चीनमधील भारतीय दुतावासाने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस
author img

By

Published : Jan 24, 2020, 3:14 PM IST

बीजिंग - कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त चीनमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या रोगामुळे आत्तापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८०० पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. व्हायरसच्या धोक्यामुळे देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संसर्ग पसरू नये म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही बंद ठेण्यात आली आहे.

  • In view of the evolving situation due to the corona virus outbreak in China as well as the decision of Chinese authorities to cancel public gathering and events, @EOIBeijing has also decided to call off the Republic Day reception scheduled to be held @EOIBeijing on January 26th.

    — India in China (@EOIBeijing) January 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
भारतीय दुतावासाने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या सरकारनेही सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांनी एकत्र न येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिजिंगमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चीनमधील भारतीय दुतावासाने दिली आहे.नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, मकाऊ, मेक्सिकोमध्येही कोरोना व्हायरसने संक्रमण झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी चीनमध्ये प्रवास करण्याबाबत नियमावली जारी केली आहे. मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहर आणि आजूबाजूच्या प्रांतात या कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.काय आहे कोरोना व्हायरस ?कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.

Intro:Body:

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित चीनमधील कार्यक्रम रद्द  

बीजिंग - कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त चीनमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या रोगामुळे आत्तापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८०० पेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. व्हायरसच्या धोक्यामुळे देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संसर्ग पसरू नये म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही बंद ठेण्यात आली आहे.

भारतीय दुतावासाने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या सरकारनेही सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांनी एकत्र न येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिजिंगमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चीनमधील भारतीय दुतावासाने दिली आहे.

नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, मकाऊ, मेक्सिकोमध्येही कोरोना व्हायरसने संक्रमण झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी चीनमध्ये प्रवास करण्याबाबत नियमावली जारी केली आहे. मध्य चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहर आणि आजूबाजूच्या प्रांतात या कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.

काय आहे कोरोना व्हायरस ?

कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.