इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन समारंभात उपस्थिती लावली. या कार्यक्रमापुर्वीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये इम्रान खान आमचा सिद्धू कुठाय असे विचारत आहेत.
-
Imran Khan Asks "Hamara Sidhu Kidr Hai" After Arriving at #KartarpurCorridor pic.twitter.com/I3XiM6dJ3h
— 24 News HD (@24NewsHD) November 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Imran Khan Asks "Hamara Sidhu Kidr Hai" After Arriving at #KartarpurCorridor pic.twitter.com/I3XiM6dJ3h
— 24 News HD (@24NewsHD) November 9, 2019Imran Khan Asks "Hamara Sidhu Kidr Hai" After Arriving at #KartarpurCorridor pic.twitter.com/I3XiM6dJ3h
— 24 News HD (@24NewsHD) November 9, 2019
कर्तारपूर कॉरिडॉरच्या समारंभस्थळी बसमधून जात असताना, आमचा सिद्धू आलाय का? तो कुठे आहे?, असे इम्रान खान यांनी विचारले आहे. इम्रान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. कर्तारपूर कॉरीडॉर पूर्ण करण्यामध्ये इम्रान खान यांनी म्हत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर मी मोदींचाही आभारी असल्याचे ते म्हणाले.
पाकिस्ताने या उद्घाटन समांरभासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले होते. त्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना परवानगी मागितली होती.