आई जर जन्म देत असेल तर, मातृभाषा मूल्य देते. ज्याप्रमाणे आईचे असणे आनंद देणारे असते, अगदी त्याचप्रमाणे मातृभाषेतून लिहिणे सुख देते. आपल्या जन्मजात भाषेत ज्याप्रकारे भावना स्पष्टपणे व्यक्त करता येतात, तसे इतर भाषांमधून करता येत नाहीत. आपल्या मातृभाषेत लिहून नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्यांची मोठी संख्या ही या तथ्याला अधोरेखित करते. २०१८ मध्ये ओल्गा तोकारझुक या पोलिश लेखिकेने साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळवला. त्याचप्रमाणे, २०१९ मध्ये पीटर हंड्के या ऑस्ट्रियन कादंबरीकाराने हा पुरस्कार जिंकला.
चार्ल्स डिकन्स, जॉर्ज इलियट, चार्लोट ब्रॉंटे, थॉमस हार्डी, एमिली ब्रॉंटे आणि सॅम्युएल बटलर यांचे व्हिक्टोरिया राणीच्या राजवटीच्या काळात लिहिलेले साहित्य 'व्हिक्टोरियन साहित्य' म्हणून समजले जाते. क्रमबद्धता, प्रगती, स्मरणरंजन आणि उपयोगितावादी ही त्याची वैशिष्ट्ये होती. विसाव्या शतकाच्या काळात, अमेरिकन कादंबरीकारांनी आपल्या महान साहित्याद्वारे जगाला आधुनिकीकरणाची ओळख करून दिली. कमीत कमी शब्द आणि मोठमोठ्या कल्पना यांचा उपयोग करून त्यांनी लघु कादंबऱ्या लिहिल्या. अशीच एक 'अर्नेस्ट हेमिंग्वे'ने लिहिलेली फक्त १२५ पानांची आधुनिकतावादी 'द ओल्ड मॅन अँड द सी' या अतिउत्कृष्ट साहित्यकृतीने साहित्याचे नोबेल जिंकले. हेमिंग्वेने दररोजच्या जीवनातील लोकांना आपल्या कादंबऱ्यांमध्ये नायक म्हणून निवडले.
ओल्गा तोकारझुकच्या 'द बुक्स ऑफ जेकब' हे ऐतिहासिक महाकाव्य असून तीन धर्म, पाच भाषा आणि सात राष्ट्रे यांना ओलांडून जाणारे आहे. पोलंडमध्ये १८ व्या शतकात फ्रँकीझम या धार्मिक चळवळीला ओल्गाने आपल्या शब्दांतून नवा दृष्टीकोन दिला. याच लेखिकेने पोलिश भाषेत 'बिएगुनी' या तुकड्यातुकड्यांनी लिहिलेल्या आणि इंग्लिश भाषेत 'फ्लाईटस' या नावाने भाषांतरित झालेल्या कादंबरीने २०१८ चा 'मॅन बुकर पुरस्कार' जिंकला. २००८ मध्ये पोलंडचा साहित्याचा सर्वोच्च 'नायके' हा पुरस्कारही तिने जिंकला. साहित्यात नोबेल पुरस्कार जिंकणारी ओल्गा ही १५ वी महिला आहे. पीटर हंड्के, ज्याने आपली वकिली कारकीर्द मध्येच अचानक थांबवून लेखन हाच व्यवसाय स्वीकारला, त्याने आपल्या सर्व कादंबऱ्या या आपली मातृभाषा असलेल्या जर्मन भाषेतच लिहिल्या. 'वून्स्क्लोसेस उन्ग्लक' ही त्याची कादंबरी आपल्या आईच्या आत्महत्येचा त्याच्यावर कसा परिणाम झाला, याबद्दल आहे. पीटरने पटकथा लेखक म्हणूनही अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
आजच्या तारखेला, ११६ जणांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यापैकी, केवळ २९ लेखकांनी इंग्लिश भाषेतून लिहिले आहे आणि ३ लेखकांनी आपली मातृभाषा आणि इंग्लिशमधून एकाच वेळी लिहिले. रवीन्द्रनाथ टागोर हे पहिले आशियाई होते ज्यांनी 'गीतांजली'साठी नोबेल पुरस्कार जिंकला. नंतर, त्यांनी पुस्तकाचा इंग्लिश भाषेत अनुवाद केला. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल, या त्रिनिदादीयन आणि टोबागोनिअन ब्रिटीश लेखकाने २००१ मध्ये आपल्या साहित्याबद्दल नोबेल जिंकले. फ्रेंच आणि जर्मन लेखकांनी प्रत्येकी १४ नोबेल पुरस्कार जिंकले आहेत. ११ स्पॅनिश, ७ स्वीडिश, ६ इटालीयन, ६ रशियन, ५ पोलिश, ३ डॅनिश, ३ नायजेरीअन, २ चीनी, २ जपानी आणि २ ग्रीक लेखकांनी आपल्या जन्मजात भाषेतील साहित्यकृतीबद्दल नोबेल पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये, फ्रान्स १६ लेखकांसह पहिल्या स्थानावर असून त्यामागोमाग अमेरिका १२, युनायटेड किंग्डम ११, जर्मनी आणि स्वीडनमधून प्रत्येकी ८, पोलंड, इटाली आणि स्पेनमधून प्रत्येकी ६, आयर्लंडमधून ४ आणि डेन्मार्क आणि नॉर्वेमधून प्रत्येकी ३ लेखकांचा समावेश आहे.
भारतीय लेखकांमध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी इंग्लिश भाषेतून लिहिणे अनिवार्य आहे, हा गैरसमज पसरला आहे. सलमान रश्दी, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि अरविंद अडिगा या होतकरू लेखकांचे उदाहरण घेऊ. भारतीय इंग्लिश लेखक 'बुकर' पुरस्कार जिंकत आहेत. परंतु प्रादेशिक भाषांतील पुस्तके इंग्लिशमध्ये भाषांतरित होत नाहीत, ज्यामुळे त्यांना जागतिक मंचावर स्पर्धा करण्यावर मर्यादा येत आहेत. अगदी प्रादेशिक भाषांमधील अभिजात कलाकृतीसुद्धा इंग्लिशमध्ये भाषांतरित होत नाहीत. दर्जेदार भाषांतर निर्माण करण्यासाठी लेखकाला स्त्रोत आणि लक्ष्यीत भाषेचे सखोल ज्ञान असले पाहिजे. टागोर यांनी गीतांजलीचे सुमार भाषांतर केल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते.
युरोपिअन आणि आफ्रिकन लेखकांच्या साहित्यकृती इंग्लिशमध्ये ताबडतोब भाषांतरित केल्या जात आहेत. तेलुगु राज्यांत भाषक विद्यापीठे असली तरीही, गुराजदा यांनी लिहिलेल्या अतिप्रसिद्ध 'कन्यासुलकमला' कादंबरीला इंग्लिश भाषांतर पाहण्यासाठी शतकाची प्रतीक्षा करावी लागली. याशिवाय, केवळ फार थोड्या संख्येने भारतीय लोक लेखन हा व्यवसाय म्हणून स्वीकारतात. आमच्या अभ्यासक्रमातही लेखन सराव याचा उल्लेख कुठेही नसतो. होतकरू लेखकांना उत्तेजन आणि साहित्याचे भाषांतराला प्राधान्य देण्याची जबाबदारी विद्यापीठे आणि सरकारवर आहे.
हेही वाचा : अजब-गजब! 'या' देशात भूतासारखी वेशभुषा करून साजरा केला जातो उत्सव