हैदराबाद - कोरोनाव्हायरसमुळे जगभरात २,५१,५५,७८२ पेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून ८,४५,९५६ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, १,७४,९९,५९२ पेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण असून त्यांचा आकडा ६१ लाखांपेक्षा अधिक झाला आहे. तर, १,८०,००० पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाची ३८,००,००० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली असून तेथे १,२०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ३० हजारांहून अधिक मृत्यू असलेल्या इतर देशांमध्ये मेक्सिको, भारत, ब्रिटन, इटली आणि फ्रान्सचा समावेश आहे.
गेल्या २४ तासात भारतात ७८,७६१ कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली असून ९४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या ३५ लाखांच्या वर गेली आहे.