ETV Bharat / international

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये बळींचा आकडा १ हजार ८०० ; १२ हजार नागरिकांवर यशस्वी उपचार

चीनमध्ये विषाणूमुळे लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. १२ फेब्रुवारीनंतर प्रत्येक दिवशी किमान १०० नागरिकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

corona death toll
कोरोना विषाणू
author img

By

Published : Feb 18, 2020, 12:50 PM IST

बिजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे बळींचा आकडा १ हजार ८०० च्या पुढे गेला आहे. तर ७२ हजार नागरिकांना विषाणूची लागण झाली आहे. चीनमधील इतर भागांमध्येही विषाणूमुळे बळी गेले आहेत. वुहान शहरातील उचांग रुग्णालयाच्या प्रमुखांचाही विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये विषाणूमुळे लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. १२ फेब्रुवारीनंतर प्रत्येक दिवशी किमान १०० नागरिकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. नुकत्याच लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे प्रशासनाला संसर्ग रोखण्यात यश येत आहे. १२ हजार ५५२ नागरिक पुर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. तसेच २६ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.

हुबेई प्रांताबाहेर विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून इतर चीनशी या भागाचा संपर्क तोडण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. बस, ट्रेन, विमान सेवा पुर्णतहा: ठप्प झाली आहे. नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेणेही मुश्किल झाले आहे. सर्व शहरे सुमसाम झाली आहे. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाला आरोग्य आणीबाणी हाताळताना अडचणी येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.