ETV Bharat / international

चीनमध्ये कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले, सर्व विदेशातून आलेले - चीन कोरोना अपडेट

गुरुवारी दिवसभरात चीनमध्ये केवळ 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कोरोनाबाधित बाहेरील देशातून आलेले आहेत.

बीजिंग
बीजिंग
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:31 PM IST

बीजिंग - चीनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणात असल्याचे वृत्तसंस्थांच्या माहितीवरून दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात चीनमध्ये केवळ 12 कोरोना रुग्ण सापडले आहेत, असे सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कोरोनाबाधित बाहेरील देशातून आलेले आहेत. चीनमध्ये बाहेरून आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,821 झाला आहे.

278 रुग्ण अद्याप रुग्णालयात

शांघायमध्ये पाच, गुआंग्डोंगमध्ये चार आणि इतर तीन ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विदेशातून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी 3,543 बाधित आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. 278 रुग्ण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा घटनांमध्ये कोठेही मृत्यू झालेला नाही, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गुरुवारी आपल्या दैनिक अहवालात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.