सिन्हुआ (चीन) - जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने आजपासून आपल्या 7व्या जनगणनेला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोगाचे उपप्रमुख निंग जिझे यांची चीनी जनतेला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. जनगणनेमध्ये लोकसंख्येचे प्रमाण, नागरिकांची कौटुंबिक स्थिती, नागरिकांचे लिंग, वैवाहिक स्थिती, शिक्षण या गोष्टींची नोंद होत असते. त्यामुळे देशातील लोकसंख्येचा अंदाज घेऊन सरकारला त्यादृष्टीने नियोजन करने, विकासात्मक योजन राबवणे सोपे जाते, असे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी जनगणनेच्या कामात सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, रविवारी हुआंग चेंगलीन यांच्या नेतृत्वात लिआंगकिंग प्रांताच्या जनगणनेला सुरुवात झाली. यावेळी ते म्हणाले, की नागरिक सहकार्य करत आहेत. अवघ्या काही मिनीटांमध्ये एका कुटुंबाच्या माहितीचे दस्तऐवजीकरण होत आहे.