कराची - पाकिस्तानमध्ये सोमवारी बस आणि इंधनाने भरलेल्या ट्रकदरम्यान झालेल्या अपघातात २७ जण ठार झाले. तर चार जण गंभीररित्या भाजले असल्याची माहिती पाकिस्तानमधील संबंधित अधिकारी साद इधी यांनी दिली आहे.
हा अपघात इरानच्या सीमेलगत नैऋत्य बलुचिस्तानमध्ये झाला. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे बचाव कार्यात अडथळा आला होता, असे इधी यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रत्यक्ष दर्शींनी सांगितल्याप्रमाणे बसच्या सहाय्याने इराणमधून इंधनाची तस्करी करण्यात येत होती. पाकिस्तानमध्ये रहदारीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने सातत्याने अपघात होत असतात.