काबूल - अफगाणिस्तानातील परवान प्रांत बॉम्बस्फोटाने हादरला आहे. राष्ट्रपती अश्रफ घनी एका रॅलीला संबोधीत करत असताना हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. एका आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला. तसचे अफगाणिस्तानातील काबूल शहरातही दुसरा स्फोट झाला.
-
Parwan police now say that eight people were killed and 10 wounded near President Ashraf Ghani's campaign gathering: TOLOnews #Afghanistan https://t.co/MrFTAfjNAq
— ANI (@ANI) September 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Parwan police now say that eight people were killed and 10 wounded near President Ashraf Ghani's campaign gathering: TOLOnews #Afghanistan https://t.co/MrFTAfjNAq
— ANI (@ANI) September 17, 2019Parwan police now say that eight people were killed and 10 wounded near President Ashraf Ghani's campaign gathering: TOLOnews #Afghanistan https://t.co/MrFTAfjNAq
— ANI (@ANI) September 17, 2019
सुरुवातीला पोलिसांनी परवान प्रांतात झालेल्या स्फोटात २४ जणांचा मृत्यू आणि ३० जण जखमी झाल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर पुन्हा एकदा पोलिसांनी मृत आणि जखमी लोकांची आकडेवारी दिली. पहिल्या स्फोटानंतर काबूल शहरामध्ये दुसरा बॉम्बस्फोट झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. दुसरा हल्ला अमेरिकेच्या दुतावासाजवळ झाल्याची माहिती मिळत आहे.