ETV Bharat / international

शेख हसीना यांच्याकडून ममता बॅनर्जींना 'दुर्गा पूजे'निमित्त भेटवस्तू

author img

By

Published : Oct 21, 2020, 5:25 PM IST

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नवरात्रातील 'दुर्गापूजे'निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी ममता यांना काही भेटवस्तूही पाठवल्या. कोलकात्यात बांगलादेश उपायुक्तालयाचे उपउच्चायुक्त (राजनैतिक) बी. एम. जमाल हुसेन यांनी दोन सीलबंद डब्यांमध्ये या भेटवस्तू बॅनर्जी यांच्या कार्यालयाकडे देण्यात आल्याचे सांगितले.

बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना न्यूज
बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना न्यूज

ढाका - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नवरात्रातील 'दुर्गापूजे'निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी ममता यांना काही भेटवस्तूही पाठवल्या.

या भेटवस्तू जेस्सोरमध्ये बेनापोल चेकपोस्टच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या. कोलकातामध्ये बांगलादेश उपायुक्तालयाने सचिवालय 'नबन्ना'मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचवण्यात आल्या.

हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर

भारतीय क्षेत्रातील पेट्रापोल चेकपोस्ट येथे बांगलादेशी अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांसाठी पाठवलेल्या या भेटवस्तू सोपवण्यात आल्या, अशी माहिती बेनापोल चेकपोस्टचे एजंट मुस्तफिजुर रहमान रुबेल यांनी दिली.

'शेख हसीना यांनी पाठवलेल्या भेटवस्तू ढाक्यातील पंतप्रधान कार्यालयात मुख्य प्रोटोकॉल अधिकारी अताउर रहमान यांच्याद्वारे पाठवण्यात आल्या होत्या. कोलकात्यात उपायुक्तालयाच्या सचिवांचे सहायक आलम हुसेन या भेटवस्तू नेण्यासाठी आले होते,' असे बेनापोल इमिग्रेशन चेकपोस्टचे प्रभारी अधिकारी अहसान हबीब यांनी सांगितले.

कोलकात्यात बांगलादेश उपायुक्तालयाचे उपउच्चायुक्त (राजनैतिक) बी. एम. जमाल हुसेन यांनी दोन सीलबंद डब्यांमध्ये या भेटवस्तू बॅनर्जी यांच्या कार्यालयाकडे देण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा - अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.