कैनबरा - कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या महामारीवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करत आहेत. ऑस्ट्रेलियातील एक कंपनी आगामी काही आठवड्यात कोव्हिड - १९ च्या औषधीची मानवी ट्रायल घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनावरील लसीचा मानवी शरिरावर काय परिणाम होतो, हे यातून समजण्यास मदत होईल.
मानवी शरिरावरील प्रयोगामध्ये चार टप्पे असणार आहेत. ही चाचणी सुरक्षीत आणि प्रभावी असल्याची खात्री करण्यासाठी कठोर प्रोटोकॉल ठेवले गेले आहेत. चाचणीचा पहिला टप्पा मे महिन्यामध्ये आणि त्याचा प्राथमिक निकाल जुलैमध्ये येण्याची अपेक्षा आहे, असे न्यूक्लियस नेटवर्कने म्हटले आहे.
लसीचा प्रभावपणा तपासण्यासाठी निरोगी स्वयंसेवकांच्या गटाची नेमणूक केली जाईल. दरम्यान जगभरामध्ये कोरोनावर उपचार करण्यासठी 20 लस विकसित होत असल्याच अंदाज जागतिक आरोग्य संघटनने व्यक्त केला आहे.