ETV Bharat / international

Attack In Pakistan : पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलावर हल्ला; 13 दहशतवादी 7 जवान ठार

पंजगुरमध्ये, हल्लेखोरांनी दोन ठिकाणांहून सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला, तर नौष्कीमध्ये फ्रंटियर कॉर्प्स (Frontier Corps) पोस्टमध्ये ( Attack In Pakistan ) घुसण्याचा प्रयत्न केला.

Attack In Pakistan
Attack In Pakistan
author img

By

Published : Feb 4, 2022, 12:38 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी सुरक्षा दलाच्या दोन तळांवर हल्ला केला. आणि त्यात झालेल्या भीषण चकमकीत 13 दहशतवादी ( Attack In Pakistan ) ठार झाले. या चकमकीत सात जवानांचाही मृत्यू झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने सांगितले. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) यांनी पंजगूर आणि नौश्की जिल्ह्यात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

पंजगुरमध्ये, हल्लेखोरांनी दोन ठिकाणांहून सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला, तर नौष्कीमध्ये फ्रंटियर कॉर्प्स (FC) पोस्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनानुसार, दोन्ही चौक्यांवर हल्लेखोरांना मारल्यावर सुरक्षा दलांनी परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला.

पाकिस्तानात नऊ दहशतवाद्यांचा खात्मा

नौष्कीमध्ये नऊ दहशतवादी आणि चार सैनिक मारले गेल्याचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी सांगितले. दहशतवादाविरोधातील हे मोठे यश असल्याचे वर्णन करून ते म्हणाले, "पाकिस्तानी लष्कराने दोन्ही ठिकाणांहून दहशतवाद्यांना हुसकावून लावले आहे. पंजगुरमध्ये लष्कराने चार ते पाच जणांना घेरले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी बलुचिस्तानमधील तळांवर दहशतवादी हल्ले उधळून लावल्याबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, "दोन्ही हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले." फ्रंटियर कॉर्प्सच्या प्रवक्त्याने पंजगूर आणि नौष्की येथील शिबिरांजवळ दोन स्फोट झाल्याचे सांगितले. बीएलएने एक निवेदन जारी करून या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. फुटीरतावादी संघटनेने अलीकडे सुरक्षा दल आणि प्रतिष्ठानांवर हल्ले वाढवले ​​आहेत. प्रांताच्या केच जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका आठवड्यापूर्वी दहा जवान शहीद झाले होते.

हेही वाचा - Heavy Rains in Brazil's Sao Paulo : ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे 18 नागरिकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.