ETV Bharat / international

अफगाणिस्तानात मशिदीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 100 ठार!

उत्तर अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतातील एका शिया मशिदीजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचे तालिबानच्या एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हा हल्ला इस्लामिक स्टेटने घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.

अफगाणिस्तानात मशिदीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 100 ठार

author img

By

Published : Oct 8, 2021, 6:51 PM IST

Updated : Oct 8, 2021, 7:00 PM IST

काबुल : उत्तर अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतातील एका शिया मशिदीजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचे तालिबानच्या एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हा हल्ला इस्लामिक स्टेटने घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.

शंभरहून अधिक दगावल्याची भिती

मशिदीत भाविकांमध्ये सहभागी झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला असावा असे कुंडुझ प्रांताचे उप पोलीस प्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी सांगितले. या घटनेत शंभरहून अधिक जण दगावल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शिया बंधूंच्या सुरक्षेसाठी तालिबान सज्ज असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असल्याचे ओबैदा म्हणाले. या घटनेचा तपास सुरू केल्याचेही ते म्हणाले.

शुक्रवारच्या नमाजदरम्यान हल्ला

गोझर-ए-सय्यद अबाद मशिदीत शुक्रवारी दुपारची नमाज सुरू असताना हा स्फोट घडला. नमाज अदा करत असताना स्फोट घडल्याचे प्रत्यक्षदर्शी अली रेझा याने सांगितले. या घटनेच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये बचाव पथकाचे कर्मचारी कपड्यांमध्ये मृतदेह गुंडाळून नेत असल्याचे दिसत आहे. तर मशिदीच्या पायऱ्या रक्ताने माखल्याचे यात दिसून येत आहे.

इस्लामिक स्टेटचे हल्ले वाढले

तालिबान नेतृत्वाला इस्लामिक स्टेटचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत असून अलिकडील काळात इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांवरही हल्ले केले आहेत.

हेही वाचा - अफगाणिस्तानात तालिबानींकडून दाढी करण्यावर बंदी; सलून दुकानदारांना नोटीस

Last Updated : Oct 8, 2021, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.