ETV Bharat / international

अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात दिला गोंडस मुलीला जन्म!

अफगाणिस्तानातून नागरिकांना सुरक्षित घेऊन येणाऱ्या अमेरिकन वायुदलाच्या एका विमानातच एका अफगाण महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. एअर मोबिलिटी कमांडने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. बाळ आणि बाळाची आई सुखरूप असून दोघांवरही जर्मनीतील एका रुग्णालयात उपचार केले जात असल्याचे कमांडने म्हटले आहे.

अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात दिला गोंडस मुलीला जन्म!
अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात दिला गोंडस मुलीला जन्म!
author img

By

Published : Aug 22, 2021, 4:08 PM IST

बर्लिन : अफगाणिस्तानातून नागरिकांना सुरक्षित घेऊन येणाऱ्या अमेरिकन वायुदलाच्या एका विमानातच एका अफगाण महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. एअर मोबिलिटी कमांडने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. बाळ आणि बाळाची आई सुखरूप असून दोघांवरही जर्मनीतील एका रुग्णालयात उपचार केले जात असल्याचे कमांडने म्हटले आहे.

विमानातच सुरू झाल्या प्रसवकळा

अफगाणिस्तानातून नागरिकांना घेऊन येणाऱ्या वायुदलाच्या सी-17 विमानातून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला विमान हवेत असतानाच प्रसवकळा सुरू झाल्या. यावेळी विमानाच्या पायलटने महिलेचे प्राण वाचावे म्हणून विमान कमी उंचीवरून उडविण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रसवकळा सुरू झाल्यानंतर महिलेच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी वातावरणात हवेचा योग्य दाब असणे गरजेचे होते. विमान कमी उंचीवर आणणे यासाठी अत्यंत गरजेचे होते. यावेळी परिस्थितीचे भान राखून वैमानिकाने कमी उंचीवरून विमान उडविण्याचा निर्णय घेतला, यामुळे महिलेचे प्राण वाचल्याचे कमांडने म्हटले आहे.

एअरबेसवर महिलेची प्रसुती

शनिवारी आपत्कालीन परिस्थितीत हे विमान जर्मनीतील रॅमस्टेन एअर बेसवर उतरले. यावेळी अमेरिकेच्या वैद्यकीय पथकाने तत्काळ दाखल होत विमानातच महिलेची प्रसूती केली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर महिला आणि तिच्या नवजात मुलीला रॅमस्टेनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघींचीही प्रकृती चांगली असल्याचे समजते आहे.

हेही वाचा - अफगाणिस्तान : भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन मायदेशी परतले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.