तैपेई - दक्षिण तैवानमधील काउशुंग शहरातील एका १३ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, 41 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी, स्थानिक वेळ पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले होते. आता आग नियंत्रणात आली आहे.
46 जणांचा मृत्यू -
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता पाहता मदत आणि बचाव कार्यासाठी जवळ ३५० अधिक जवानांची मदत घेतली गेली. या आगीमध्ये जवळपास ४६ जणांचा मृत्यू तर ४१ जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आगीच्या ठिकाणावरून 32 मृतदेह थेट शवागारात पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इतर 14 जणांनासह एकुण 55 जणांना रुग्णालयात नेण्यात आले. तैवानमध्ये, मृत्यूची अधिकृत पुष्टी केवळ रुग्णालयात केली जाऊ शकते.
'पहाटे तीनच्या ऐकला स्फोट'
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सूर्यास्तापूर्वी इमारतीचा आणखी एका भागात शोध घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. तैवानच्या दूरचित्रवाणीवर दाखवलेल्या व्हिडिओमध्ये इमारतीच्या खालच्या मजल्यांमधून नारिंगी जाळा आणि धूर निघत असल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरून त्यावर पाणी फवारले. ओळख नसलेल्या एका महिलेने सांगितले की तिचे 60 ते 70 वर्षांचे पालक आत होते. प्रत्यक्षदर्शींनी तैवानच्या माध्यमांना सांगितले की त्यांनी पहाटे 3 च्या सुमारास स्फोट ऐकला, इमारत सुमारे 40 वर्षे जुनी आहे. खालच्या स्तरावर दुकाने आणि वरील भागात अपार्टमेंट आहेत. इमारतीचे खालचे मजले पूर्णपणे काळे पडले होते.
हेही वाचा - धक्कादायक : पिझ्झासाठी 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या