बीजिंग : युरोपनंतर चीनमध्ये अतिवृष्टी आणि पुराचे थैमान बघायला मिळत असून या भीषण पुरात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांताला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. प्रांतात गेल्या एक हजार वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून यामुळे इथे अक्षरशः जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला तातडीने मदत कार्य राबविण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रत्यक्षदर्शी या महाभयंकर पुराचे वर्णन जगबुडीसारखे करत आहेत.
-
Zhengzhou, China.
— ian bremmer (@ianbremmer) July 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Think your commute is bad?
Try getting stuck in a flooded subway train. pic.twitter.com/gE3neHRwhv
">Zhengzhou, China.
— ian bremmer (@ianbremmer) July 20, 2021
Think your commute is bad?
Try getting stuck in a flooded subway train. pic.twitter.com/gE3neHRwhvZhengzhou, China.
— ian bremmer (@ianbremmer) July 20, 2021
Think your commute is bad?
Try getting stuck in a flooded subway train. pic.twitter.com/gE3neHRwhv
गाड्या, घरे कागदाप्रमाणे गेले वाहून
या महापुराविषयीचे अनेक व्हिडिओ चीनी सोशल मीडियातून शेअर केले जात आहेत. यावरून तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. सबवे रेल्वेत छातीपर्यंत साचलेल्या पाण्यात नागरिक मदतीची वाट बघत उभे असल्याचे तसेच कार आणि घरे पुराच्या लाटेत अगदी कागदाप्रमाणे वाहून जात असल्याचे चित्र या व्हिडिओत बघायला मिळत आहे. तर सरकारी संस्थांनी तत्काळ मदतकार्य राबविले जात असल्याचे व्हिडिओ जारी केले आहेत.
-
First Europe, now China (Zhengzhou, to be specific).
— ian bremmer (@ianbremmer) July 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The floods are horrifying. pic.twitter.com/d7Q1MgmpEe
">First Europe, now China (Zhengzhou, to be specific).
— ian bremmer (@ianbremmer) July 20, 2021
The floods are horrifying. pic.twitter.com/d7Q1MgmpEeFirst Europe, now China (Zhengzhou, to be specific).
— ian bremmer (@ianbremmer) July 20, 2021
The floods are horrifying. pic.twitter.com/d7Q1MgmpEe
24 तासांत 457.5 मिमी पाऊस, 1000 वर्षांतील सर्वाधिक पाऊस
पावसाच्या आकडेवारीनुसार झेंगझोऊ शहरात मंगळवारी चोवीस तासांतच 457.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची नोंद घेण्यास सुरूवात झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याचे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार हा पाऊस गत एक हजार वर्षांमधील सर्वाधिक आहे.
वारसा स्थळांनाही पुराचा फटका
सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा प्रांत असलेल्या हेनानमध्ये अनेक महत्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळेही आहेत. यांनाही या महापुराचा प्रचंड फटका बसला आहे. महापुरामुळे प्रांतातील दूरसंचार आणि दळणवळण यंत्रणेलाही फटका बसला आहे. प्रांतातील दळणवळण जवळपास ठप्प झाल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.
बचावकार्य सुरू
पोलीस, अग्निशमन दल आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य राबविले जात आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे काम बचाव पथकाकडून केले जात आहे. हवामान विभागाने प्रांतात पुढील चोवीस तासांत आणखी जोरदार अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा - EUROPE FLOODS : जर्मनी, बेल्जियममध्ये पुराने हाहाकार; 150 बळी