बँकॉक - थायलंडच्या नाखों सी थम्मरट प्रांतात वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
हेही वाचा - इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू
आपत्ती निवारण आणि शमन विभागाच्या (डीडीपीएम) अहवालानुसार नाखोंमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिणेकडील सहा प्रांतांमध्ये गेल्या महिन्याच्या उत्तरार्धापासून वादळामुळे सतत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे महापूर आला असून याची तीव्रता वाढली आहे. या आपत्तीत आतापर्यंत 13 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे थायलंडच्या 6 दक्षिणेकडील राज्यांना भीषण पूर आला आहे. दक्षिणेकडील या सहा प्रांतांमध्ये 66 जिल्ह्यांतील 2 हजार 680 खेड्यांना या पुराचा फटका बसला आहे. या गावांमधील 3 लाख 21 हजार 57 कुटुंबे बाधित झाली आहेत. सूरत ठाणी, क्रबी, ट्रांग, फाथलंग, सोनखला आणि नाखों सी थम्मरट हे दक्षिणेकडील प्रांत प्रभावित आहेत. अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत मदत उपाययोजना करत आहेत.
हेही वाचा - फिलीपाईन्समध्ये चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 53 वर