ढाका - शनिवारी सकाळी बांगलादेशच्या जॉयपूरहाट जिल्ह्यात एका रेल्वेगाडीने रेल्वे क्रॉसिंगवर बसला धडक दिली. या दुर्घटनेत 12 जण ठार झाले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी ए.के.एम. आलमगीर यांनी पत्रकारांना या अपघाताबद्दल माहिती दिली. सकाळी सातच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत 12 मृतांव्यतिरिक्त आणखी सहा जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तसंस्था सिन्हुआने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा - काबूलमध्ये कार बॉम्बस्फोटात 9 जण ठार
'राजशाही शहराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर हा भीषण अपघात झाला,' असे आलमगीर म्हणाले. 'घटनास्थळावरून 10 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तर, आठ जखमींना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला,' असे त्यांनी सांगितले.
जॉयपूरहाट जिल्हा प्रशासनाचे प्रमुख शरीफ इस्लाम यांनी सांगितले की, गेटमनच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. 'अपघाताच्या वेळी गेटमन झोपला होता,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - अपहरण केलेल्या 344 नायजेरियन विद्यार्थ्यांची सुटका : अधिकारी