वॉशिंग्टन - स्पेसएक्स या अमेरिकी खासगी अवकाशसंशोधन संस्थेने ६० स्टारलिंक उपग्रह अंतराळात सोडले. अनेक दिवसांपासून खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही मोहीम, अखेर काल (बुधवार) पार पडली.
अमेरिकेतील, फ्लोरिडा राज्यात असलेल्या केप कॅनावेरल एअरफोर्स स्थानकावरून, फाल्कन-९ या अग्निबाण (रॉकेट) हे उपग्रह लाँच करण्यात आले. फाल्कन-९ची ही तिसरी अंतराळयात्रा होती. यानंतर तासाभरात, सर्व उपग्रहांना यशस्वीपणे आपापल्या कक्षेमध्ये सोडण्यात आले.
'स्पेसएक्स'ने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीभोवती १२,००० उपग्रहांचे मोठे जाळे तयार करण्याचा कंपनीचा उद्देश्य आहे. त्याचा एक भाग म्हणून ही मोहीम पार पाडण्यात आली. या उपग्रहांच्या माध्यमातून अधिक मजबूत अशी इंटरनेट सेवा पुरवण्याचा कंपनीचा मानस आहे.
हेही वाचा : चिक्की नव्हे तर... चक्क सूर्य! सौरपृष्ठभागाचे सर्वात सुस्पष्ट छायाचित्र प्रसिद्ध