वाशिंगट्न - अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच तेथील सर्वोच्च न्यायालयाने ट्रंम्प यांच्या रिपब्लीकन पार्टीला झटका दिला आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकन पार्टीच्या उत्तरी कॅरोलिनाच्या युद्ध भूमीवरील पत्राद्वारे मतदानाची मुदतवाढ थांबविण्याची मागणी फेटाळली आहे.
न्यायालयाने दाखल याचिकेवर गुरुवारी सुनावणी करताना मुख्य न्यायाधीशांपुढे दाखल करण्यात आलेली याचिका आणि त्यांच्यामाध्यामातून न्यायालयात दाखल करण्यात आलेला मागणी अर्ज फेटाळण्यात येत आहे.
तसेच बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लीकनची उत्तर कॅरोलिनाच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्राद्वारे मतदानाच्या सहा दिवसाच्या मुदतवाढीस विरोध करणारी पहिली याचिका फेटाळली होती. त्यानंतर दुसऱ्यांदाही त्यांनी न्यायालयाकडे ती मुदतवाढ रोखण्यासाठी अर्ज केला होता.