ETV Bharat / international

किम जोंगच्या तब्येतीसह उत्तर कोरियातील राजकीय घडामोडींवर आमची नजर - माईक पोम्पीओ

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उनच्या तब्येतीबाबत बोलताना आमच्याकडे अहवाल देण्यासाठी सध्या माहिती उपलब्ध नाही. मात्र, किम जोंगबद्दलच नव्हे तर उत्तर कोरियाच्या आतील भागात काय चालले आहे यावर आमचे काटेकोरपणे लक्षअसल्याचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले.

माईक पोम्पीओ
माईक पोम्पीओ
author img

By

Published : Apr 30, 2020, 1:33 PM IST

वाशिंगटन/सेऊल - गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. याबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. कदाचित ते गंभीर आजारी आहेत. मात्र, त्यांच्या राजवटीत काय घडत आहे, यावर आम्ही नजर ठेवून असल्याचे पोम्पीओ यांनी म्हटले आहे.

सिओलस्थित योनहॅप न्यूज एजन्सीने बुधवारी पोम्पीओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उनच्या तब्येतीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काहीही बोलण्याचे टाळले. “आम्ही त्यांना पाहिले नाही.” आज आमच्याकडे याबाबत देण्यासाठी कोणतीही माहिती नाही. मात्र, आम्ही फक्त अध्यक्ष किम जोंगवरचच नव्हे तर उत्तर कोरियाच्या आतील भागात काय चालले आहे याचा मागोवा ठेवून त्याची बारकाईने पाहणी करत आहोत, असे पोम्पीओ म्हणाले,

यासोबतच, पोम्पीओ यांनी उत्तर कोरियाच्या नागरिकांना कोरोनापासून होणारा धोकादेखील नोंदविला आहे. कम्युनिस्ट राजवटीमुळे येथे कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या देशातदेखील कोरोनाचा उद्रेक झाल्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. तसेच, योम्हॅप न्यूज एजन्सीबरोबर झालेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर कोरियामध्येही दुष्काळ, अन्नाची कमतरता असा धोका निर्माण होण्याचा खरोखर धोका असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "मला खूप चांगली कल्पना आहे, परंतु मी आता याबद्दल बोलू शकत नाही. मी फक्त त्यांच्या शुभेच्छा देतो. किम जोंग- यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मात्र, सध्या ते कोठे आहेत याबद्दल कुणालाही माहिती नाही, असे ते म्हणाले.

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे गेल्या ११ एप्रिलपासून कुठल्याही प्रकारच्या सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाहीत. इतकेच नव्हे तर, ते १५ एप्रिलला उत्तर कोरियाचे संस्थापक आणि त्यांचे आजोबा किम इल-गाय यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमातही अनुपस्थित होते. हा कार्यक्रम उत्तर कोरियातील महत्वाचा सोहळा मानला जातो, आणि या कार्यक्रमात किम जोंगची अनुपस्थितीने ते गंभीर आजारी असल्याची शक्यता असल्याचे योनहॅप न्यूज एजन्सीच्या अहवालात म्हटले होते. मात्र, दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी किम जोंगच्या प्रकृतीसंदर्भात खोट्या बातम्या येत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तर दुसरीकडे शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावरील धोका टाळण्यासाठी किंवा कोरोनासारखा गंभीर संसर्ग टाळण्यासाठी ते समुद्र किनाऱ्यावरील एका रिसॉर्टमध्ये लपवून असल्याचेही सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.