वॉशिंग्टन - कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तान न्यायालयाने 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यावर अमेरिकन सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने हाफिज सईदवर कारवाई करुन दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय वचनबद्धता आणि बांधिलकी पाळण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानने याच प्रकारची कारवाई दहशतवादी प्रकारांना आळा घालण्याबाबत कायम ठेवावी, असे अमेरिक्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
हाफिज सईदचा वेगवेगळ्या दहशतवादी कारवायामध्ये सहभाग आहे. तसेच 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याला तो जबाबदार आहे. ज्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसह 166 भारतीयांचा जीव गेला होता. दहशतवादाला वित्तपुरवठा केल्यावरून हाफिज सईदवर केलेली कारवाई ही दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण करणारा दहशतवाद कमी करण्याच्या दृष्टिने टाकलेले एक पाऊल आहे.
-
US calls for Hafiz Saeed to be held accountable for involvement in 26/11 Mumbai terror attack
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/peeWyUBXMQ pic.twitter.com/lpSMyDamTn
">US calls for Hafiz Saeed to be held accountable for involvement in 26/11 Mumbai terror attack
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2020
Read @ANI Story | https://t.co/peeWyUBXMQ pic.twitter.com/lpSMyDamTnUS calls for Hafiz Saeed to be held accountable for involvement in 26/11 Mumbai terror attack
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2020
Read @ANI Story | https://t.co/peeWyUBXMQ pic.twitter.com/lpSMyDamTn
दहशतवादी हाफिज सईद याने लाहोर आणि गुजरनवाला शहरातील दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी प्रत्येकी साडेपाच वर्ष तुरुंगवास आणि १५ हजार दंड ठोठावला आहे, असे एकूण 11 वर्षांची सजा त्याला दिली आहे. मात्र, दोन्ही सजा एकदाच लागू होत असल्याने तुरुंगवासाचा कालावधी हा साडेपाच वर्षच राहिल.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तान एफटीएफ पाकिस्तानवर नजर ठेवून आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्यात आले आहे. जून २०१८ मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, समाधानकारक उपाययोजना न केल्यामुळे फेब्रुवारी 2019 महिन्यापर्यंत पाकिस्तान ग्रे यादीतच राहिला आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी फएटीएफने पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० पर्यंतची मुदत दिली आहे.